Attack on Minister Video : गावकऱ्यांचा मंत्री अन् आमदारावर हल्ला; 1 किलोमीटर पाठलाग करत हुसकावून लावले...

Bihar Minister Shravan Kumar Attacked by Villagers : लोकांनी जवळपास एक किलोमीटरपर्यंत त्यांचा पाठलाग केला. यावरूनच त्यांचा राग दिसून येतो. गावकऱ्यांच्या हल्ल्यात मंत्र्यांचा सुरक्षारक्षक जखमी झाला आहे.
Attack on Minister Video : गावकऱ्यांचा मंत्री अन् आमदारावर हल्ला; 1 किलोमीटर पाठलाग करत हुसकावून लावले...
Published on
Updated on

Villagers Chase Minister for 1 Kilometer : बिहारमधील पुढील काही महिन्यांवर विधानसभेची निवडणूक आहे. त्यासाठी आतापासूनच आमदार, मंत्र्यांची मतदारांच्या गाठीभेठी घेण्यासाठी चढाओढ लागली आहे. आनंदी प्रसंग असो वा दुर्दैवी घटना, मतदारांसोबत असावे यासाठी त्यांची धावपळ सुरू आहे. पण बुधवारी एक मंत्री आणि स्थानिक आमदाराला गावकाऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागल्याची घटना घडली आहे.

गावकऱ्यांनी मंत्री आणि आमदाराला गावातून हिसकावून लावले असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. गावातील लोकांनी जवळपास 1 किलोमीटरपर्यंत त्यांचा पाठलाग केल्याची माहिती समोर आली आहे. बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील मलावा गावात ही घटना घडली आहे. त्यानंतर या गावात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

दोन दिवसांपूर्वी रस्ते अपघातामध्ये गावातील नऊ जणांचा एकाचवेळी मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी ग्रामीण विकास मंत्री श्रवण कुमार गावात पोहचले होते. त्यांच्यासोबत स्थानिक आमदार प्रेम मुखियाही होते. ते गावात पोहचल्यानंतर अर्ध्या तासाने अचानक गावकाऱ्यांनी त्यांच्या ताफ्यावर थेट हल्ला केला.

Attack on Minister Video : गावकऱ्यांचा मंत्री अन् आमदारावर हल्ला; 1 किलोमीटर पाठलाग करत हुसकावून लावले...
Political funding India : राजकारणात खळबळ; गुजरातमधील गल्लीतल्या 10 पक्षांना तब्बल 4300 कोटींच्या देणग्या

लोकांनी जवळपास एक किलोमीटरपर्यंत त्यांचा पाठलाग केला. यावरूनच त्यांचा राग दिसून येतो. गावकऱ्यांच्या हल्ल्यात मंत्र्यांचा सुरक्षारक्षक जखमी झाला आहे. या घटनेनंतर मंत्री व आमदार सुरक्षारक्षक व इतर कार्यकर्त्यांच्या मदतीने तिथून बाहेर पडले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील जवळपासच्या विविध पोलिस ठाण्यांतील अधिकारी व कर्मचारी गावात दाखल झाले.

Attack on Minister Video : गावकऱ्यांचा मंत्री अन् आमदारावर हल्ला; 1 किलोमीटर पाठलाग करत हुसकावून लावले...
PM Modi Trump News : मोदींना फोन करताच 5 तासांत चक्रं फिरली! ट्रम्प यांचा आतापर्यंतचा सर्वात मोठा गौप्यस्फोट

घटनेनंतर मंत्री श्रवण कुमार यांनी सांगितले की. रस्ते अपघातामध्ये नऊ महिलांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मी तिथे गेलो होतो. सरकारकडून जी मदत देण्यात आली आहे, त्याची माहिती देत होतो. मी त्यांच्या दु:खात सहभागी होण्यासाठी गेलो होतो. काही लोक त्यामध्ये नाराज असतील तर त्याची माहिती मला नाही, असेही श्रवण कुमार यांनी सांगितले.    

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com