Gokul Election : मुश्रीफ विरहित गोकुळ म्हणणाऱ्या शिवाजी पाटलांकडून मुश्रीफांचे कौतुक : "भांडलो म्हणून भाजप-शिवसेनेला जागा"

Gokul Election News : निवडणूक प्रचारात आमदार शिवाजीराव पाटील यांनी हसन मुश्रीफ यांच्या निवडणूक अनुभवाचे कौतुक केले. जागावाटप, जुने मतभेद आणि सतेज पाटील यांच्यावरील टीकेमुळे राजकीय चर्चा रंगली आहे.
MLA Shivajirao Patil
MLA Shivajirao PatilSarkarnama
Published on: 
Updated on: 

Gokul Election News : गोकुळ दूध संघातील संस्था पात्र-अपात्रेवरून सुरू असलेल्या सहा महिन्याच्या वादात मंत्री हसन मुश्रीफ विरहित गोकुळची निवडणूक घ्या, असे विधान करणाऱ्या आमदार शिवाजीराव पाटील यांनीच मुश्रीफांचे गोडवे गायला सुरुवात केली आहे. गोकुळ दूध संघाच्या निवडणूक प्रचारनिमित्ताने झालेल्या मेळाव्यात आमदार पाटील यांनी मुश्रीफ यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याने चर्चेचे गुऱ्हाळ सुरु झाले आहे.

आमदार शिवाजीराव पाटील म्हणाले, "मी राजकारणात नवखा असून गोकुळ कशी जिंकायची, हे मी बोलणे चुकीचे ठरेल. निवडणुका कशा जिंकायच्या, याचा दांडगा अनुभव मुश्रीफ यांना आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांनी ते दाखवून दिले. चंदगड मतदारसंघातील जागांच्या निकालावरून मी त्यांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे".

मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुश्रीफ यांच्यावर नेतृत्व सोपवून दाखविलेल्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही. मुश्रीफ यांच्यासोबत माझे व्यक्तिगत मतभेद नाहीत. जिल्ह्यात सर्वजण दिग्गज आहेत, गडहिंग्लज आम्हाला मिळावे यासाठी मी भांडलो. म्हणूनच भाजप आणि शिवसेनेला प्रत्येकी सात जागा मिळाल्याचे स्पष्टीकरण आमदार शिवाजीराव पाटील यांनी दिले.

MLA Shivajirao Patil
Sangli DCC Bank : गोपीचंद पडळकरांना हायकोर्टाचा दणका; सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील अर्ज बाद

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील यावर स्पष्टीकरण दिले. आमदार पाटील यांनी भांडणाचा उल्लेख केल्यानंतर मंत्री मुश्रीफ यांच्याकडून आपल्यात भांडण नाही मात्र तुमच्या मध्येच भांडण सुरू होते असे म्हणत पलटवार केला.

सतेज पाटलांवर टीका

यावेळी त्यांनी आमदार सतेज पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले. पाटलांना मुख्यमंत्री व्हायचे आहे म्हणून एकटा लढतोय असे ते सांगत आहेत. मात्र त्यांच्याकडे हजारभर ही सभासद नाहीत, त्यांच्या वक्तव्याला बळी पडू नका असेही मंत्री मुश्रीफ म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com