Gokul meeting : मोठी बातमी! गोकुळच्या वार्षिक सभेचा मुहूर्त ठरला; 'ही' तारीख निश्चित, सहकार विभागाकडून मुदतवाढ

Gokul Annual General Meeting : गोकुळ दूध संघावर प्रशासक असताना संचालक मंडळ अस्तित्वात नसल्याने वार्षिक सर्वसाधारण सभा घेता आली नव्हती. मात्र, आता संघावर नवीन संचालक मंडळ अस्तित्वात आले आहे. त्यामुळे ३० नोव्हेंबरपूर्वी वार्षिक सभा घेणे अपेक्षित होते. या पार्श्वभूमीवर संचालक मंडळाने सहकार विभागाकडे मुदतवाढ मागितली होती.
Gokul
GokulSarkarnama
Published on: 
Updated on: 

Kolhapur News, 28 Nov : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाची रखडलेली वार्षिक सर्वसाधारण सभा अखेर होणार आहे. येत्या २१ डिसेंबरला ही सभा घेण्याचे निश्चित झाले असून, सहकार विभागाने संचालक मंडळाला मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे या सभेत कोणते महत्त्वाचे निर्णय होणार आणि निवडणुकीनंतरचे राजकीय वातावरण कसे राहणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

गोकुळ दूध संघावर प्रशासक असताना संचालक मंडळ अस्तित्वात नसल्याने वार्षिक सर्वसाधारण सभा घेता आली नव्हती. मात्र, आता संघावर नवीन संचालक मंडळ अस्तित्वात आले आहे. त्यामुळे ३० नोव्हेंबरपूर्वी वार्षिक सभा घेणे अपेक्षित होते.

या पार्श्वभूमीवर संचालक मंडळाने सहकार विभागाकडे मुदतवाढ मागितली होती. संचालक मंडळाच्या विनंतीचा विचार करून सहकार विभागाने सभेसाठी मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार आता २१ डिसेंबर रोजी गोकुळची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडणार आहे.

Gokul
Sugarcane FRP : एफआरपीपेक्षा कमी दर जाहीर करणाऱ्या कारखान्यांना दणका; आता थेट हायकोर्टातच याचिका

दरम्यान, गोकुळच्या निवडणुकीनंतर होणारी ही महत्त्वाची सभा असल्याने राजकीय वर्तुळाचेही त्याकडे लक्ष लागले आहे. निवडणुकीतील आरोप-प्रत्यारोपांचे आणि निकालानंतर अध्यक्षपदासासाठी झालेल्या राजकारणाचे पडसाद सभेत उमटणार का?

Gokul
MGNREGA Payments : चार वर्षांपासून शेतकऱ्यांचे पैसे अडकले! काँग्रेस खासदाराचा पंचायत समितीसमोर ठिय्या

विरोधकांकडून कोणते मुद्दे उपस्थित केले जाणार? सत्ताधारी संचालक मंडळाला कोणत्या प्रश्नांना सामोरे जावे लागणार? याची उत्सुकता आहे. त्यामुळे २१ डिसेंबरच्या सभेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.