Gokul Election: 'स्वाभिमानी मतदारांच्या हक्काचा खून'; गोकुळच्या सत्तासंघर्षावरुन कोल्हापुरात पोस्टरबाजी, सतेज पाटलांनी थोपटले दंड!

Gokul Election 2026 Kolhapur Protest: गोकुळ दूध संघावरील शासनाच्या नव्या अध्यादेशाविरोधात कोल्हापुरात राजकीय वातावरण तापले आहे. आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली ९ नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर संघर्ष मोर्चा काढण्यात येणार आहे.
Gokul Election 2026   Kolhapur Protest
Gokul Election 2026 Kolhapur ProtestSarkarnama
Published on: 
Updated on: 

Kolhapur News: राज्यातील वर्गातील सहकारी संस्थांवर 500 कोटी पेक्षा अधिक उलाढाल असणाऱ्या संस्थांवर चार शासन नियुक्त सदस्य आणि एक शासकीय सदस्य नियुक्तीचा अध्यादेश निघाला. त्यामुळे गोकुळ दूध संघावर महायुतीची सत्ता येण्यास मदत होणार आहे.

परिणामी गोकुळ दूध संघात बहुमतात असणाऱ्या समविचारी आघाडीच्या वतीने या अध्यादेशाच्या विरोधात येत्या सोमवारी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहे. काँग्रेस नेते, आमदार सतेज पाटील यांच्याकडून जय्यत तयारी करण्यात आली असून सध्या जिल्ह्यात महायुतीकडून करण्यात आलेल्या या प्रकारामुळे सर्व स्तरातून संताप व्यक्त होत आहे.

कोल्हापुरात विविध ठिकाणी या मोर्चा संदर्भात फलक लावण्यात आले आहेत. अध्यादेशाच्या विरोधात कोल्हापुरात पोस्टर झळकले आहेत. "कोल्हापूरच्या स्वाभिमानी मतदारांच्या हक्काचा खून करण्यात आलेला आहे," अशी टॅगलाईन पोस्टरवर आहे.

गोकुळच्या सत्तासंघर्षाची धग आता थेट रस्त्यावर पोहोचणार आहे. राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात आमदार सतेज पाटील यांनी संघर्ष मोर्चाची हाक दिली आहे. सोमवारी (९ नोव्हेंबर) सकाळी दहा वाजता कोल्हापुरातील दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य संघर्ष मोर्चा काढण्यात येणार आहे.

Gokul Election 2026   Kolhapur Protest
Pune DP: पुण्याच्या 9 गावांच्या डीपीत 143 बदल! तुमच्या भागाचा विकास आराखडा बदलला; कुणाचे रस्ते झाले अरुंद, कुणाचे आरक्षण हटले?

मोर्चात जिल्ह्यातील विविध पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते लोकशाहीच्या रक्षणासाठी सहभागी होणार आहेत. मोर्चाच्या नियोजनासाठी कोल्हापूर काँग्रेस कमिटी कार्यालयात समविचारी पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक झाली.

Gokul Election 2026   Kolhapur Protest
Teacher Recruitment: शिक्षक व्हायचंय? वयाची चिंता सोडा! खाजगी शाळांतील भरतीसाठी सरकारचा मोठा निर्णय; आता कमाल वयोमर्यादाच नाही

बैठकीत महायुतीवर गोकुळची सत्ता बळकावण्यासाठी कुटील राजकारण केल्याचा आरोप करण्यात आला. मोर्चात कुटुंबीयांसह मोठ्या संख्येने सहभागी होऊन कोल्हापुरचा स्वाभिमान आणि ताकद दाखवून देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

हुकूमशाही मोडून काढून लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी सरकारला धडकी भरवणारा मोर्चा काढू, असा आक्रमक इशारा महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांनी दिला. ही लढाई केवळ कोल्हापूर किंवा महाराष्ट्रापुरती मर्यादित नसून, देशाची लोकशाही टिकवण्याची लढाई आहे. त्यामुळे सर्वपक्षीयांनी या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन नगरसेवक सुनील मोदी यांनी केले.

Gokul Election 2026   Kolhapur Protest
Shalarth Portal: शालार्थ आयडीच्या प्रलंबित प्रकरणांना मिळणार गती; शिक्षण विभागाचा मोठा प्रशासकीय बदल, मंजुरी आता कोणाकडे?

गोकुळ हा कोल्हापूर जिल्ह्याच्या स्वाभिमानाचा विषय आहे. लोकशाहीच्या रक्षणासाठी हा मोर्चा महत्त्वाचा असून, कोल्हापुरातील कामगार, युवक आणि विविध संघटनांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन कोल्हापुरचा स्वाभिमान उंचावावा, असे आवाहन आनंद माने यांनी केले.

गोकुळचा ब्रँड वाचवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असून, या संघर्ष मोर्चाच्या माध्यमातून शासनाला काळा कायदा रद्द करण्यास भाग पाडू, असा इशारा सरलाताई पाटील, काँग्रेसचे करवीर तालुकाध्यक्ष राम पाटील यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.