Gokul Election : न्यायालयात मुश्रीफांनी माघार घेताच चिरंजीव नविद मुश्रीफ 'गोकुळ' बिनविरोधसाठी कोरेंना भेटले...

Gokul Milk Union Election : गोकुळ दूध संघातील संचालकांची मुदत मे महिन्यात संपत आहे. त्यामुळे गोकुळची आगामी निवडणूक घेण्यासाठी शासन स्तरावर हालचाली सुरू आहेत. यंदा गोकुळच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. राज्यातील एक नंबरचा गोकुळ दूध संघ म्हणून पाहिले जात आहे.
Hasan Mushrif, Vinay Kore, Navid Mushrif
Navid Mushrif meets MLA Vinay Kore to discuss the Gokul Milk Union election and the possibility of an unopposed decision amid rising political activity.Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News, 26 Mar : मुंबई हायकोर्टाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने 1200 सभासदांबाबत तत्कालीन दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा आदेश रद्द केला. शिवाय गोकुळसह मंत्री हसन मुश्रीफ यांच्या न्यायालयीन लढाईतून माघार घेतली. त्यामुळे गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी पुढाकार घेऊन वाचवलेल्या बाराशे सभासदांवर कारवाईची टांगती तलवार आहे.

न्यायालयाच्या या निकालामुळे गोकुळच्या राजकारणात हे चित्र असताना तिकडे मंत्री मुश्रीफ यांचे चिरंजीव आणि गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांच्यासह संचालकांनी आमदार डॉ. विनय कोरे यांची भेट घेतली. या भेटीमध्ये गोकुळ दूध संघाचे आगामी निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रस्ताव कोरे यांच्यासमोर ठेवून त्या संदर्भात पुढाकार घ्यावा अशी भूमिका मांडल्याचे समोर येत आहे.

गोकुळ दूध संघातील संचालकांची मुदत मे महिन्यात संपत आहे. त्यामुळे गोकुळची आगामी निवडणूक घेण्यासाठी शासन स्तरावर हालचाली सुरू आहेत. यंदा गोकुळच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. राज्यातील एक नंबरचा गोकुळ दूध संघ म्हणून पाहिले जात आहे. मागील 25 वर्षाची सत्ता खालसा केल्यानंतर काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सत्ता स्थापन केली.

Hasan Mushrif, Vinay Kore, Navid Mushrif
Narhari Zirwal video : नरहरी झिरवाळांना राष्ट्रवादीतून मिळाला पहिला पाठिंबा : अशोक खरात प्रकरण अंगलट येतंय म्हणून डाव टाकल्याचा दावा

मात्र यावेळी राजकीय समीकरणे वेगळे असल्याने महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे दोन्ही बाजूने तगडी लढत होण्याचा अंदाज आहे. मात्र या निवडणुकीला संचालकांना पाण्यासारखा पैसा खर्च करावा लागणार आहे. निवडणुकीतील इर्षा आणि स्पर्धा पाहता आर्थिक बाजूचा विचार संचालक आणि उमेदवारांना करावा लागणार आहे. हा खर्च टाळण्यासाठी ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी काही संचालकांचे मत आहे. त्या संदर्भात दबक्या आवाजामध्ये संचालकांची चर्चा सुरू आहे.

दरम्यान बुधवारी संचालक मंडळाची बैठक पार पडल्यानंतर अध्यक्ष नवीत मुश्रीफ यांच्यासह संचालक मंडळाने डॉ. आमदार विनय कोरे यांची भेट घेतली. या भेटीमध्ये गोकुळची संचालकांची मुदत संपत असल्याने त्यावर प्रशासक नेमण्या संदर्भात आणि बाराशे सभासदांच्या अपात्रतेबाबत चर्चा झाली. दरम्यान निवडणुकीतील वाया जाणारा अनावश्यक खर्च टाळण्यासाठी या संचालकांनी डॉक्टर विनय कोरे यांनी ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी केल्याची समजते.

Hasan Mushrif, Vinay Kore, Navid Mushrif
Ashok Kharat Case: उद्धव ठाकरेंचीही खरातवर 'मेहरबानी'; 'मातोश्री'वरील मॅडमच्या आग्रहाखातर 'शिवनिका'ला पाणी मंजूर?

तर पुढील काही दिवसांमध्ये आमदार सतेज पाटील यांची देखील काही संचालक भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. या भेटीदरम्यान आमदर डॉ. कोरे यांनी संचालकांची चांगली कान उघडणी केली. मागील निवडणुकीत चंदगड आणि कागलमध्ये आपल्या पॅनल मधील दोन उमेदवारांना आपण मतदान दिले नाही. यावेळी तुमच्या बाबत असे काही घडले तर चालेल का? असं कोरे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com