Gokul Politics : गोकुळच्या राजकारणामुळे चढली पोलीस ठाण्याची पायरी; ठरावावरून सचिवाला मारहाण

Gokul Milk Union election dispute : नेत्यांमधील वाद जमल्यानंतर आता गावागावात दूध संस्थांमध्ये ठरावावरून वातावरण धूमसत आहे. ठराव कोणाकडे द्यायचा यावरून वाद सुरु आहे. असाच प्रकार आजरा तालुक्यात घडला आहे.
Gokul Milk Union Row | Secretary Assaulted Over Resolution
Gokul Milk Union Row | Secretary Assaulted Over ResolutionSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News, 23 Jun : गोकूळ दुध संघाच्या निवडणुकीच्या ठरावावरून अखेर पोलीस ठाण्याची पायरी चढावी लागली आहे. आजरा तालुक्यातील देवर्डे येथील रवळनाथ दुध संस्थेचे सचिव राजेंद्र बाळकृष्ण पाटील यांना ठराव देण्यावरून माराहाण करण्यात आली आहे.

याबाबत गंगाराम कोंडीबा मळेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सोमवारी सकाळी ८.३० वाजता दुध संकलन वेळी हा प्रकार घडला. पाटील हे या दुध संस्थेचे सचीव आहेत व मळेकर हे सभासद आहेत. गोकुळच्या राजकारणात ठरावाला अधिक महत्त्व आहे.

दुग्ध निबंध कार्यालयाकडे हे ठराव जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नेत्यांमधील वाद जमल्यानंतर आता गावागावात दूध संस्थांमध्ये ठरावावरून वातावरण धूमसत आहे. ठराव कोणाकडे द्यायचा यावरून वाद सुरु आहे. असाच प्रकार आजरा तालुक्यात घडला आहे.

Gokul Milk Union Row | Secretary Assaulted Over Resolution
Anna Hazare RTI Protest : ‘अधिकारीच मालक बनलेत!’; माहिती अधिकार कायद्यातील बदलांवर अण्णा हजारे संतप्त, सरकारला दिला मोठा इशारा

यातील फिर्यादी हे रवळनाथ दुध व्यावसायिक संस्था, मर्या. देवर्डे या संस्थचे सेक्रेटरी आहेत. आरोपी हे सभासद आहेत. संस्थेमार्फत गोकुळ दुध संघाचे मतदानसाठी प्रतिनीधी म्हणून निवडीसाठी संचालक मंडळाची सभा होती. या सभेला चेअरमन हजर नव्हते. फक्त तिन संचालक हजर असताना मळेकर याने आपल्या नावाचा ठराव झाला असे जाहीर केले. त्यावेळी सचीव पाटील हे विचारणा करण्यासाठी पुढे गेले.

Gokul Milk Union Row | Secretary Assaulted Over Resolution
Nashik MLC Election : दराडेंच्या पराभवाला ठाकरेंची 38 मते कारणीभूत; शिंदेंचा बदला घेण्यासाठी राऊतांची खेळी, पण गोकुळ गीतेंनी ठाकरेंनाच दिला धक्का

"मी चेअरमनच्या गैरहजेरीत देखील ठराव करुन घेवू शकतो, तुझा यात काय संबंध' असे म्हणून पाटील यास संचालक यांच्या समोर शिवीगाळी करून कॉलर पकडून मारहाण केली. तोंडावर हाताने मारल्याने पाटील किरकोळ जखमी झाले. पुढील तपास आजरा पोलीस करीत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com