Devendra Fadnavis: मुश्रीफ, कोरे अन् सतेज पाटलांनी एकत्र बसून निर्णय घ्यावा, सरकार कोणाला पाठवणार नाही, अन्यथा मुख्यमंत्र्यांचा 'डीडीआर'चा दम

Gokul Quorum: गोकुळ दूध संघातील कोरमच्या पेचावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हसन मुश्रीफ, विनय कोरे आणि सतेज पाटील यांना एकत्र बसून तोडगा काढण्याचे आवाहन केले.
Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis | Drought Relief 2026
Maharashtra Chief Minister Devendra FadnavisSarkarnama
Published on: 
Updated on: 

Gokul Election News: गोकुळ दूध संघातील सत्तासंघर्षावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. चार शासन नियुक्त सदस्यांच्या अध्यादेशामुळे समविचारी आघाडी आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या गटासमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूरमधील महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना महत्त्वाचा सल्ला देतानाच इशाराही दिला आहे. हसन मुश्रीफ, विनय कोरे आणि आमदार सतेज पाटील यांनी एकत्र बसून निर्णय घ्यावा. सरकार गोकुळवर कोणाचीही नियुक्ती करण्यास उत्सुक नाही; मात्र वारंवार सभांचा कोरम पूर्ण झाला नाही, तर पुढील अधिकार सरकारकडे येतील, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने सध्या राज्यात राजकीय खलबत्ते उडत आहेत. महायुतीने काढलेल्या या अध्यादेशामुळे गोकुळ दूध संघावर महायुतीची सत्ता येण्याची शक्यता आहे. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यातील महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना कोरमपूर्तीवरुन चांगलाच दम दिला. जर वारंवार सभा गठीत होत नसेल. तर 'डीडीआर'च्या (प्रशासक) माध्यमातून पुढील गोष्टी होतील. असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

"हसन मुश्रीफ, विनय कोरे आणि आमदार सतेज पाटील यांनी एकत्र बसून निर्णय करावा. सरकार कोणालाच पाठवणार नाही, सरकारला त्यामध्ये रस नाही. सरकार फक्त वैधानिक जबाबदारी पाहत आहे. पण लक्षात घ्या वारंवार कोरमची समस्या निर्माण झाली तर अधिकार सरकारकडेच येणार आहेत.

"काही लोकांची नियुक्ती करण्यासाठी हा कायदा केलेला आहे. बैठकीला जो कोरम आवश्यक आहे. तो दोन्ही बाजूकडून कोरम पूर्ण होऊ शकत नाही, म्हणून हा कायदा केलेला आहे. हा वैधानिक प्रश्न निर्माण झाला आहे. दोन्ही बाजूला कोरम इतकी मते नाहीत.त्यामुळे राज्य सरकारला गोकुळ वर कब्जा करायची आहे. ही भावना चुकीची आहे". असे स्पष्टीकरण फडणवीस यांनी दिेले.

Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis | Drought Relief 2026
Devendra Fadnavis : सीएम फडणवीसांची ऐन दिवाळीतच मोठी घोषणा; 5 हजार रुपयांच्या मदतींनंतर आता शेतकऱ्यांसाठी आणखी एक दिलासा

‘गोकुळ एका जिल्ह्यापुरती मर्यादित संस्था’

गोकुळमध्ये सुमारे पाच हजार मतदार आहेत आणि ही संस्था एका जिल्ह्यापुरती मर्यादित आहे. अशा एका संस्थेसाठी राज्य सरकार आतुर आहे, असे काही नाही. त्याची सरकारला आवश्यकता नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले. “मी आजही दोन्ही गटांना सांगतो की, त्यांनी एकत्र बसून निर्णय घेतला, तर शासन नियुक्त सदस्यांची गरजच लागणार नाही. गोकुळच्या निवडणुकीचा सध्याच्या राज्याच्या राजकारणावर काही परिणाम पडणार नाही,” अशी भूमिका फडणवीस यांनी मांडली.

Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis | Drought Relief 2026
Sharad Pawar: शरद पवारांना ब्रीच कँडी रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज; डॉक्टरांनी प्रकृतीबाबत काय दिली अपडेट?

मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे गोकुळमधील सत्तासंघर्षात आता मुश्रीफ, कोरे आणि सतेज पाटील यांच्यात चर्चा होत, तिन्ही नेते एकत्र बसून तोडगा काढणार की कोरमच्या मुद्द्यावरून पुढील प्रशासकीय हस्तक्षेप होणार, याकडे लोकांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.