Gokul Politics : 'गोकुळ'मधील महायुतीचा सस्पेन्स मुख्यमंत्री संपवणार, जागावाटपाचा फाॅर्म्युला ठरला? बैठकीत काय घडलं?

Mahayuti Meeting Devendra Fadnavis : बुधवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवास्थानी महायुतीच्या नेत्यांच्या बैठक पार पडली. मुख्यमंत्र्यांच्यासमोर नेत्यांनी आपले मत मांडले.
Gokul Mahayuti Meeting Devendra Fadnavis
GokulMahayuti Meeting Devendra Fadnavissarkarnama
Published on: 
Updated on: 

Devendra Fadnavis Politics : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी महायुतीच्या जागावाटप संदर्भात महत्वाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निवास्थान वर्षा बंगल्यावर पार पडली. या बैठकीत सर्व पक्षीय नेत्यांची मुख्यमंत्र्यांनी ऐकून घेऊन त्यांच्या भावनांना वाट मोकळी करून दिली. मात्र जागावाटप संदर्भात कोणताचा फॉर्म्युला या बैठकीत ठरला नाही.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज (गुरुवारी) स्वतः याबाबत निर्णय जाहीर करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यावेळी जिल्ह्यातील प्रमुख महायुतीचे नेते या बैठकीला उपस्थित होते.

गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी महायुती एकत्रित लढणार आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) , भारतीय जनता पक्ष, शिवसेना (एकनाथ शिंदे), जनसुराज्य शक्ती अशा सर्व पक्षातील प्रमुख नेत्यांची बुधवारी रात्री मुंबईतील वर्षा बंगल्यावर बैठक झाली.

यामध्ये मुख्यमंत्री यांनी प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना त्यांची बाजू मांडण्यास सांगितले. येथे प्रत्येक पक्षाने आपल्याकडे किती ठराव आहेत? यासह आपली बाजू कशी भक्कम आहे? याची मांडणी केली. तसेच प्रत्येक पक्षाला पाहिजे असलेल्या जागा का पाहिजेत याचे स्पष्टीकरण दिले.

प्रत्येकाकडे किती ठराव आहेत? यावर जागा वाटप करायचे की पक्ष म्हणून जागा वाटप करायचे यावरही चर्चा झाली. विशेष म्हणजे स्वतः मुख्यमंत्र्यांनी यांनी सर्व पक्षाच्या नेत्यांचे म्हणणे ऐकून घेतले. मात्र कोणताही निर्णय दिला नाही. पुढील बैठक असल्याने याबाबतचा निर्णय कळविला जाईल, असे सांगण्यात आल्याचेही विश्वसनीय वृत्त आहे.

राष्ट्रवादीला 10 जागा?

बैठकीस आजी-माजी आमदार खासदार मंत्री यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी ही उपस्थित होते. दरम्यान, यां बैठकीत मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून आपल्याकडे सर्वाधिक ठराव असल्याचा दाखला दिला. शिवाय विरोधकांच्या एका गटाचा पाठिंबा घेतल्याचे सांगत सर्वाधिक ठराव असल्यामुळे 10 जागांची मागणी केली. तर शिवसेना आणि भाजपकडून प्रत्येकी 8-8 जागाचा दावा केला. तर जनसुराज्य शक्तीकडून आमदार विनय कोरे यांच्याकडून 3 जागांची मागणी केली.

बैठकीत प्रत्येक नेत्याने आपले कोणकोणत्या तालुक्यात किती ठराव आहेत याची माहिती दिली. तसेच आजपर्यंत गोकुळ सह इतर राजकारणासाठी उपयुक्त इच्छुकांची माहिती दिली. त्यामुळे इतक्या जागा मागत असल्याचाही दावा केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com