

Sangli Bank Loan : सांगली जिल्ह्याच्या राजकारण आमदार गोपीचंद पडळकर हे नेहमीच आमदार, माजी मंत्री जयंत पाटील यांना टार्गेट करत असतात. मात्र, आता त्यांनी जयंत पाटलांनी सांगली जिल्हा बँकेचा 54 कोटींचं कर्ज थकवल्या गंभीर आरोप केला आहे. तसेच स्वतःला सुसंस्कृत समजतात, मग 54 कोटी भरा, अशी मागणी केली आहे.
'जिल्ह्यातले सगळे टगे आपल्याला गुंड म्हणतात आणि पडळकर सहकार मोडून खाईल म्हणतात. पण मी सोसायटीचं २० हजारांच्यावर कर्ज घेतले नाही, मग मी कसं मोडून खाईन ? असा पडळकर यांनी केला. तसेच तुम्ही सहकारात काही शिल्लक ठेवले नाही,सगळं विकून टाकलं आहे, अशी टीकाही केली आहे.
एका कार्यक्रमात बोलताना देखील जतमध्ये पाणी येताच जयंत पाटील पिसाळले, अशी बोचरी टीका पडळकर यांनी केली होती. ते म्हणाले होते, पाण्याचा व्हिडिओ पाहून ते जयंत पाटील पिसाळले. ते म्हणाले की पाणी काय पहिल्यांदाच सोडलंय का? मी पाणी सोडलंय.
पडळकर म्हणाले की जतचा पाणी प्रश्न सुटणार आहे. पुढील एक वर्षात जत तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पाणी नेण्याचे नियोजन आम्ही सरकारच्या माध्यमातून करतोय. यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानतो.
नुकत्याच झालेल्या सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत गोपीचंद पडळकर यांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे आटपाडी येथे त्यांचा सत्कार सोहळा पार पडला. त्यावेळी त्यांनी जयंत पाटील यांच्यावर टीका केली. निवडणुकीत जत सोसायटी गटातून पडळकर यांनी विनोद पवार यांचा २० मतांनी पराभव केला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.