Gopichand Padalkar: फडणवीसांनी समज देऊनही पडळकरांनी जयंत पाटलांवर हल्ला चढवताना पुन्हा खालची पातळी गाठलीच; म्हणाले,'कितव्या बायकोचं...'

Gopichand Padalkar Vs Jayant Patil : काही दिवसांपूर्वीच भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्यावर पातळी सोडून टीका केली होती. पडळकर यांनी एकेरी भाषेत ‘जयंत पाटील हे राजारामबापू पाटील यांची औलाद वाटत नाहीत’ असे विधान केले होते. यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला होता.
Jayant Patil Sharad Pawar Gopichand Padalkar Devendra Fadnavis
Jayant Patil Sharad Pawar Gopichand Padalkar Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Sangli News :गेल्या काही दिवसांपासून भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्यावर सातत्यानं टीका करताना दिसून येत आहे. याचदरम्यान,पडळकर यांनी काही दिवसांपूर्वीच जयंत पाटलांच्या वडिलांचं नाव घेवून खालच्या पातळीवर टीका केली होती. यावरून त्यांच्यावर चौफेर टीका होत आहे. यानंतर शरद पवारांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाच फोन लावत नाराजी व्यक्त केली होती. फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांना (Gopichand Padalkar) कडक समजही दिली होती. पण त्यानंतरही पडखळकरांनी आणखी खालच्या स्तरावर जात पाटलांवर पुन्हा एकदा जहाल टीका केली आहे.

भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे मंगळवारी(ता.30) सांगली जिल्ह्यातील आरेवाडी येथे एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर पुन्हा एकदा तोफ डागली. पडळकर म्हणाले,‘जयंत पाटील कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं?’अशी खोचक विचारणा केली.

गोपीचंद पडळकरांनी यावेळी जयंत पाटलांवर टीका करताना एकेरी भाषा वापरल्याचं समोर येत आहे.ते म्हणाले, ख्रिश्चन धर्मांतराबाबत आवाज उठवल्यावर राज्यात सगळे फादरी रस्त्यावर आले. माझी आमदारकी रद्द करण्याची मागणी करत होते.त्या ख्रिश्चन समाजाच्या सभेला जयंत पाटील जातात,माझ्याविरोधात बोलतात,ते हिंदूविरोधी असून ईश्वरपूरच्या लोकांनी त्यांना जागा दाखवायची वेळ आली असल्याचा हल्लाबोलही त्यांनी केला.

माझ्या डोक्यात जायची वाट बघू नका..डोक्यात जाण्याची प्रयत्न कराल ती तुमच्यासाठी काळी कूटअंधाराची रात्र असेल असा इशाराही पडळकरांनी दिला. महाराष्ट्र संस्कृती सभा झाली.पण त्याचसभेत मला आया-बहिणींवर शिव्या देत होते.मला गोप्या-गोप्या म्हणत होते, मी तुम्हाला जयंत्या म्हटलं, तर चालेल का,असा संतप्त सवालही पडळकरांनी यावेळी पाटील यांना केली.

Jayant Patil Sharad Pawar Gopichand Padalkar Devendra Fadnavis
Gondia Navratri Clash: गोंदियात ऐन नवरात्रौत्सवातच वाद पेटला; उद्धव ठाकरे अन् अजितदादांच्या जिल्हाध्यक्षांमध्ये तुफान राडा

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ज्या मतदारसंघात वोटचोरी झाली, तिथं राजीनामा द्या आणि परत एकदा निवडणूक लढवा,असं आवाहन दिलं होतं. त्याला प्रत्युत्तर देताना जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मी मंगळसूत्र चोरांच्या विरोधात लढत नाही, हा माझा प्रॉब्लेम असल्याचा खोचक टोला पडळकरांना लगावला होता.

आमदार जयंत पाटील यांच्यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पातळी सोडून टीका केली होती. पडळकर यांनी एकेरी भाषेत ‘जयंत पाटील हे राजारामबापू पाटील यांची औलाद वाटत नाहीत’ असे विधान केले होते. यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला होता. त्या वादावर खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांनीही भाष्य केले होते.त्यावेळी पवारांचा फोन आल्याचे सांगताना ‘आपण बोलताना त्याचे काय अर्थ निघतात,त्याचा विचार केला पाहिजे,’असा सल्ला फडणवीसांनी पडळकरांना दिला होता.

Jayant Patil Sharad Pawar Gopichand Padalkar Devendra Fadnavis
Imtiaz Jaleel vs Sangram Jagtap : हिंसाचारानंतर 'AIMIM'ची सभा रद्द; इम्तियाज जलील यांचा षडयंत्राचा आरोप, तर जगताप म्हणाले, 'ते काही साधूसंत...'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोपीचंद पडळकर यांनी जे विधान केले,ते योग्य आहे,असं माझं मत नाही. कुणाच्याही वडिलांबद्दल किंवा परिवाराबद्दल अशा पद्धतीने स्टेटमेंट करणे, हे योग्य नाही. त्यासंदर्भात मी गोपीचंद पडळकर यांच्यासोबतही बोललो आहे.त्यांनाही मी सांगितलं असल्याचं फडणवीसांनी म्हटलं होतं.

तसेच ज्येष्ठ नेते शरद पवार यांचाही मला फोन आला हेाता.तेही माझ्यासोबत गोपीचंद पडळकरांनी केलेल्या विधानासंदर्भात बोलले. त्यांनाही मी सांगितले की, ‘गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या विधानाचे आम्ही कधीच समर्थन करणार नाही’ असेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Jayant Patil Sharad Pawar Gopichand Padalkar Devendra Fadnavis
Vinod Tawde News : विनोद तावडेंनी नेत्यांमधील जुना वाद मिटवत सुपरस्टारला आणलं पक्षात; 'एनडीए'ची ताकद वाढवली...

गोपीचंद पडळकर हे तरुण नेते आहेत,ते अतिशय ॲग्रेसिव्ह नेते आहेत.अनेकदा ॲग्रेशन दाखवताना आपल्या बोलण्याचा काय अर्थ निघेल, हे ते लक्षात घेत नाहीत.म्हणून त्यांना मी हे सांगितले आहे की, तुम्ही हे सर्व लक्षात घेऊनच आपण ॲग्रेशन ठेवले पाहिजे.तुम्हाला भविष्यात चांगला नेता म्हणून मोठी संधी आहे, त्यामुळे आपण बोलत असताना त्याचे काय अर्थ निघतील, याचा विचार केला पाहिजे, असा सल्लाही मी गोपीचंद पडळकर यांना दिला, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com