Ahmednagar Politics : 'शासन' आता प्रथम जेजुरीद्वारी, त्या नंतरच शिर्डीवारी; तारीख पुन्हा पुढे ढकलली!

Radhakrushna Vikhe Patil News : मोठ्या तयारीचा शासनाचा खर्च वाया गेल्याने टीकाही झाली.
Ahmednagar Politics : Devendra Fadnavis : Eknath Shinde
Ahmednagar Politics : Devendra Fadnavis : Eknath ShindeSarkarnama
Published on: 
Updated on: 

राजेंद्र त्रिमुखे :

Ahmednagar News : "शासन आपल्या दारी" हा शिंदे-फडणवीस सरकारने प्रथमच सुरू केलेल्या कार्यक्रमाची मोठी प्रसिद्धी करून, कार्यक्रम भव्यदिव्य आणि नागरिकांच्या मोठ्या उपस्थितीवर भर देण्यात येत आहे. मात्र आता पर्यंत अनेक जिल्ह्यात तारखा घोषित करून आणि पूर्व तयारी करूनही कार्यक्रम पुढे ढकलण्याची नामुष्की सरकारवर आली आहे. आता 7 ऑगस्ट रोजी शिर्डी (अहमदनगर) इथे होणारा कार्यक्रम पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आला आहे.

Ahmednagar Politics : Devendra Fadnavis : Eknath Shinde
Maharashtra Cabinet Expansion : शहा-शिंदे-फडणवीस-पवारांच्या बैठकीत अखेर ठरलं ! मंत्रिमंडळ विस्तार आठवडाभरात..

नगर जिल्ह्यात शिर्डी जवळ काकडी इथे "शासन आपल्या दारी" कार्यक्रम होणार म्हणून दोन तारखांची घोषणा झाली. त्यानंतर सदर कार्यक्रम 7 ऑगस्ट रोजी होणार असल्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी जाहीर केले. मात्र आता 7 ऑगस्ट रोजी होणारा "शासन आपल्या दारी" कार्यक्रम गुरुवारी 11 ऑगस्ट रोजी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

शिर्डी येथील कार्यक्रम पुढे ढकलण्यामागे जेजुरी येथील अनेकदा पुढे ढकलण्यात आलेला कार्यक्रम असल्याचे समजते. जेजुरी इथे विविध कारणांनी जवळपास पाच वेळेस "शासन आपल्या दारी" कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. यात ठिकाणी करण्यात आलेल्या मोठ्या तयारीचा शासनाचा खर्च वाया गेल्याने टीकाही झाली. आता जेजुरी इथे 7 ऑगस्ट रोजी, तर शिर्डी इथे 11 ऑगस्ट रोजी 'शासन दारी' येणार आहे.

Ahmednagar Politics : Devendra Fadnavis : Eknath Shinde
Maharashtra Cabinet Expansion : शहा-शिंदे-फडणवीस-पवारांच्या बैठकीत अखेर ठरलं ! मंत्रिमंडळ विस्तार आठवडाभरात..

शिर्डी इथे होणाऱ्या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित असून पालकमंत्री या नात्याने राधाकृष्ण विखे पाटील यांनी कार्यक्रमाची जोरदार तयारीचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. यासाठी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थित सर्व विभागांच्या अनेक बैठका घेतल्या आहेत. जिल्हाभरातून 'लाभार्थ्यां'ना पोहचता यावे, म्हणून तब्बल 616 राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसचे नियोजन करण्यात आले असून, तीस हजारांहून अधिक लाभार्थी उपस्थित राहतील या दृष्टीने प्रयत्न आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.