Barshi Politics : बार्शीत सोपल-राऊत गटात अटीतटीचा सामना; दोन्ही गटांकडून पाचही ग्रामपंचायतींवर विजयाचा दावा

Gram Panchayat Election Result : पाच ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांनी नोटाला १३६ मते दिली आहेत.
Barshi Gram Panchayat Election Result
Barshi Gram Panchayat Election ResultSarkarnama
Published on
Updated on

Solapur News : बार्शी तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींचे निकाल आज (ता. ६ नोव्हेंबर) जाहीर झाले. माजी मंत्री दिलीप सोपल आणि आमदार राजेंद्र राऊत गटामध्ये चुरशीची लढाई दिसून आली. विशेष म्हणजे पाचपैकी बहुतांश ग्रामपंचायतींवर सोपल आणि राऊत गटाकडून दावा करण्यात आला आहे. पाच ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांनी नोटाला १३६ मते दिली आहेत. (Gram Panchayat Election Result : Results of five village panchayats in Barshi declared)

बार्शी तालुक्यातील तालुक्यातील घारी, मुंगशी (वा), चिंचोली-ढेंबरेवाडी, अंबाबाईचीवाडी, उंडेगाव या पाच ग्रामपंचायतींची पंचवार्षिक, तर भालगाव, चिखर्डे, तुळशीदासनगर येथे पोटनिवडणुकीसाठी रविवारी चुरशीने मतदान झाले. त्याचा निकाल आज जाहीर झाला. निकालानंतर आमदार राऊत आणि सोपल गटाने ग्रामपंचायत निवडणुकीत आमचेच सदस्य मोठ्या संख्येने निवडून आले आहेत, असे दावे केले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उंडेगाव ग्रामपंचायतीत सरपंचपदाच्या निवडणुकीत प्रकाश गुंड यांना ६५६ मते मिळाली. त्यांनी सुधाकर जगताप (४३३ मिळालेली मते) यांंचा पराभव केला. अंबाबाईची वाडीमध्ये सरपंचपदासाठी अटीतटीची निवडणूक झाली. त्यात त्रिंबक कापसे (४८५ मते) विजयी झाले असून, त्यांचे प्रतिस्पर्धी विष्णू ढेंगळे यांना ३९३ मते पडली.

मुंगशी (वा) येथील सरपंचपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव होते. सरपंचपदाच्या निवडणुकीत कल्पना क्षीरसागर (७५८ मते) यांनी बाजी मारली, तर त्यांच्या विरोधक चंद्रकला क्षीरसागर यांना ५७९ मते मिळाली. घारी येथे सरपंचपदाच्या अटीतटीच्या लढतीत छाया काशीद यांनी (८०३) विजयश्री खेचून आणली, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी उषा बसाटे यांना ७३८ मते मिळाली. चिंचोली-ढेंबरेवाडी येथील सरपंचपद अनुसूचित जातीसाठी राखीव होते. या ठिकाणी अमर कसबे बिनविरोध विजयी झाले आहेत.

Barshi Gram Panchayat Election Result
Solapur Gram Panchayat Result : सोलापुरात पुन्हा कमळ फुलले; ४९ ग्रामपंचायतींवर सत्ता, १४ ठिकाणी अजितदादांचा झेंडा

दरम्यान, घारी, उंडेगाव, मुंगशी, अंबाबाईचीवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी निवडून आलेले उमेदवार आपल्या गटाचे आहेत, असा दावा माजी मंत्री दिलीप सोपल गटाने केला आहे. विजयी झालेले सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि कार्यकर्त्यांनी बार्शी औद्योगिक वसाहतीचे चेअरमन सुधीर सोपल यांच्या समवेत सोपल बंगला येथे आनंदोत्सव साजरा केला.

आमदार राजेंद्र राऊत यांनीही उंडेगाव, अंबाबाईचीवाडी, चिंचोली-ढेंबरेवाडी, घारी येथे आमच्या गटाचे सदस्य निवडून आले आहेत, असा दावा केला. पोटनिवडणुकीत भालगाव १, चिखर्डे १, तुळशीदासनगर ३ येथे आमचे उमेदवार विजयी झाल्याचे आमदार राऊत यांनी सांगितले.

Barshi Gram Panchayat Election Result
Gram Panchayat Election Results : नारायण पाटलांनी ३० वर्षांची सत्ता राखली अन्‌ मुलाला सरपंचही केले!

मुंगशीत दोन आणि चार मतांनी विजय

मुंगशी येथील प्रभाग दोनमध्ये अमोल क्षीरसागर तीन मतांनी निवडून आले. त्यांना २३८ मते मिळाली, त्यांचे प्रतिस्पर्धी महेश क्षीरसागर यांना २३३ मते मिळाली. याच प्रभागात नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री राखीव मध्ये आशाबाई राक्षे चार मतांनी विजयी झाल्या. त्यांना २३६ मते मिळाली, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी जयश्री राक्षे यांना २३२ मते पडली.

Barshi Gram Panchayat Election Result
Gram Panchayat Results : बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवारच ‘दादा’; इंदापूरसह चार तालुक्यांतील ६४ पैकी ४२ ग्रामपंचायतींवर झेंडा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com