Solapur Gram Panchayat Result : सोलापुरात पुन्हा कमळ फुलले; ४९ ग्रामपंचायतींवर सत्ता, १४ ठिकाणी अजितदादांचा झेंडा

Gram Panchayat Election Result : अक्कलकोट, माळशिरस, दक्षिण सोलापूर आणि मंगळवेढ्यात भारतीय जनता पक्षाने मोठे यश मिळविले आहे.
Solapur Gram Panchayat Election Result
Solapur Gram Panchayat Election Result Sarkarnama
Published on
Updated on

Solapur News : सोलापूर जिल्ह्यातील १०९ ग्रामपंचायतींचे निकाल आज (ता. ६ नोव्हेंबर) जाहीर झाले असून, भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक ४९ ग्रामपंचायतींमध्ये बाजी मारली आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार गटाने १४ ग्रामपंचायतींची सत्ता मिळविली आहे. उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस पक्षाची मात्र मोठी पीछेहाट झाली आहे. (BJP dominates 49 gram panchayats in Solapur district)

सोलापूर जिल्ह्यातील १०९ ग्रामपंचायतींसाठी रविवारी (ता. ५ नोव्हेंबर) चुरशीने ८१.३२ टक्के मतदान झाले होते. त्याची मतमोजणी आज झाली. त्यात भाजपने जिल्ह्यातील १०९ पैकी ४९ ग्रामपंचायतीत सत्ता मिळविली आहे, त्यामुळे पक्षाने पुन्हा एकदा जिल्ह्यावरील वर्चस्व आधोरेखित केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Solapur Gram Panchayat Election Result
Gram Panchayat Election Results : नारायण पाटलांनी ३० वर्षांची सत्ता राखली अन्‌ मुलाला सरपंचही केले!

अक्कलकोट, माळशिरस, दक्षिण सोलापूर आणि मंगळवेढ्यात भारतीय जनता पक्षाने मोठे यश मिळविले आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी पुन्हा अक्कलकोटमध्ये बाजी मारली आहे. आमदार समाधान आवताडे यांनी मंगळवेढा तालुक्यातील १४ ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. मोहिते पाटील गटाने माळशिरसमध्ये १० पैकी ७ ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकवला आहे.

भाजपपाठोपाठ सोलापुरात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने यश मिळविले आहे. अजित पवार गटाने १४ ग्रामपंचायतीवर सत्ता मिळवली आहे. करमाळ्यात अजित पवार गटाचे आमदार संजय शिंदे यांची पीछेहाट झाली आहे. तेथे शिंदे गटाचे माजी आमदार नारायण पाटील यांच्या गटाने आठ ग्रामपंचायतींवर विजय मिळवल्याचा दावा केला आहे. शरद पवार गटाला जिल्ह्यात १० ग्रामपंचायतींवर सत्ता मिळवता आली आहे. पंढरपुरात शरद पवार गटाच्या अभिजित पाटील‌ यांनी विजय मिळवला आहे.

Solapur Gram Panchayat Election Result
Gram Panchayat Results : बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवारच ‘दादा’; इंदापूरसह चार तालुक्यांतील ६४ पैकी ४२ ग्रामपंचायतींवर झेंडा

काॅंग्रेस पक्षाला जिल्ह्यातील फक्त सहा ग्रामपंचायतींमध्ये यश मिळवता आले. उद्धव ठाकरे गटाला संपूर्ण जिल्ह्यात फक्त दोन ग्रामपंचायतींवर झेंडा फडकावता आला आहे. शेतकरी कामगार पक्षाने सांगोल्यातील तीन ग्रामपंचायतींवर आपली सत्ता मिळविली आहे. चिकमहूद ग्रामपंचायतीची सत्ता आमदार शहाजी पाटील यांनी कायम राखली आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने या ग्रामपंचायत निवडणूक निकालाला महत्त्व आहे.

Solapur Gram Panchayat Election Result
Gram Panchayat Election Results : हर्षवर्धन पाटलांनी गड राखला; राष्ट्रवादीचे डाव उलथवत बावड्याची सत्ता राखली

ग्रामपंचायत निवडणुकीतील पक्षीय बलाबल

  • भाजप - ४९

  • शिंदे सेना- १०

  • अजित पवार गट- १४

  • उद्धव ठाकरे गट -०२

  • काँग्रेस- ०६

  • शरद पवार गट-१०

  • शेकाप-०३

  • इतर- १५

Solapur Gram Panchayat Election Result
Gram Panchayat Results : शहाजीबापूंनी गावची सत्ता राखली; पण तीन ग्रामपंचायतींवर शेकापचा झेंडा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com