Mission Madha : पालकमंत्री गोरेंचे ‘मिशन माढा’; झेडपीची 3 सभापतिपदे नेली लोकसभा मतदारसंघात!

Solapur ZP Sabahapati Election : सोलापूर झेडपी सभापती वाटपात माढा मतदारसंघाला अधिक प्राधान्य दिले गेले. यामुळे जयकुमार गोरेंचे ‘मिशन माढा’ अधिक बळकट होत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
Solapur ZP Sabahapati Election
Solapur ZP Sabahapati ElectionSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 27 March : सोलापूर जिल्हा परिषदेतील बहुचर्चित विषय समित्यांच्या सभापतिपदाची नावे आज (ता. 27 मार्च) जाहीर झाली आहेत. त्यात माळशिरसच्या संस्कृती सातपुते, दक्षिण सोलापूरचे रामप्पा चिवडशेट्टी, माढ्याच्या ॲड अमृता वाघे, आणि सांगोल्याचे चेतनसिंह केदार सावंत यांना संधी देण्यात आलेली आहे. यातील तीन सभापतिपदे ही माढा लोकसभा मतदारसंंघात देण्यात आली असून उर्वरीत दोन सभापतिपद ही सोलापूर लोकसभा मतदारसंघात आहेत, त्यामुळे पालकमंत्री जयकुमार गोरेंचे यांची ‘मिशन माढा लोकसभा’च्या दिशेने जोरदार वाटचाल सुरू असल्याचे दिसून येत आहे.

जिल्हा परिषदेच्या इतिहासात भारतीय जनता पक्षाने (BJP) 68 पैकी 38 जागा जिंकून निर्विवाद सत्ता मिळविली आहे. धाराशिव लोकसभा मतदारसंघातील बार्शीचे दीपक वैद्य यांच्याकडे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद देण्यात आले आहे. बार्शीला प्रथमच अध्यक्षपदाचा मान मिळाला आहे. उपाध्यक्षपद हे उत्तर सोलापूर तालुक्यातील इंद्रजीत पवार यांच्याकडे सोपविण्यात आलेले आहे, ते सोलापूर लोकसभा मतदारसंघात येते.

लोकसभा निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटील यांनी बंड करून माढा (Madha) मतदारसंघातून खासदार बनले आहेत. भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पराभावाचा सामना करावा लागला, त्याची खंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून भाजपच्या मतदारसंघातील नेत्यांपर्यंत सर्वांनाच आहे. माढा लोकसभा मतदासंघ पुन्हा ताब्यात घेण्याच्या उद्देशानेच मुख्यमंत्री फडणवीस यांनी पालकमंत्री म्हणून सोलापूरची जबाबदारी सोपवली आहे.

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी बालेकिल्ला असलेल्या राष्ट्रवादीला धोबीपछाड देत जिल्ह्यातील अकरापैकी 10 पंचायत समित्या आणि सोलापूर जिल्हा परिषद एकहाती भाजपच्या ताब्यात मिळवून दिल्या आहेत. हे करताना त्यांनी बलाढ्य राष्ट्रवादीला कमकुवत करण्याचे काम इमानेइतबारे केले आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सोपवलेली अर्धी लढाई गोरेंनी जिंकली आहे.

Solapur ZP Sabahapati Election
Solapur ZP Sabhapati : सोलापूर झेडपीचे सभापती जाहीर : सातपुते, चिवडशेट्टी, वाघे, केदार-सावंत यांना लॉटरी

आता माढा लोकसभा मतदासंघाची लढाई जिंकण्याची तयारी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सुरू केली आहे. जिल्हा परिषदेचे सभापती निवडीतून त्यांनी ते दाखवून दिले आहे. कारण माढा लोकसभा मतदारसंघात तीन सभापतिपदे त्यांनी दिली आहेत, उपाध्यक्षांसह दोन सभातिपदे हे सोलापूर लोकसभा मतदासंघाकडे असणार आहे.

माळशिरसमधील दहिगाव गटातून निवडून आलेल्या माजी आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते, माढ्यातील टेंभुर्णी गटातून निवडून आलेल्या ॲड अमृता वाघे, तर सांगोला तालुक्यातील चोपडी मतदारसंघातून जिल्हा परिषद सदस्य झालेले भाजपचे पश्चिम विभागाचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांना संधी देण्यात आलेली आहे.

Solapur ZP Sabahapati Election
Solapur ZP Sabhapati : माढा, माळशिरसला झेडपी सभापतिपद निश्चित?; अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, मोहोळमधून 'ही' नावे आघाडीवर

झेडपीच्या या निवनिर्वाचित पदाधिकारी आणि पंचायत समित्यांचे सभापती यांच्या माध्यमातून भाजपचा थेट जनतेशी कनेक्ट राहील, याची काळजी पालकमंत्री गोरे यांनी घेतला, त्याचा फायदा सुमारे तीन वर्षांनंतर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी होईल, यादृष्टीने गोरे यांनी मोर्चेबांधणी सुरू केलेली आहे. माढ्यात विजयी पताका फडविल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोपवलेली संपूर्ण मोहिम गोरे यांच्याकडून फत्ते झाली, असे म्हणता येईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com