
Kolhapur News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातील जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांची निवड झाल्याने शिवसेनेत खळबळ माजली. त्यानंतर युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया जिव्हारी लागल्यानंतर शिवसेनेचे नूतन दक्षिण विधानसभा प्रमुख हर्षल सुर्वे यांनी राजीनामा देत शिंदेंच्या सेनेत प्रवेश केला. मात्र सुर्वे यांना पक्षात घेताच कोल्हापूर जिल्ह्यातील शिंदे यांच्या शिवसेनेतील देखील नाराजी समोर आली आहे. सुर्वे यांना पक्षात घेताच जिल्ह्यातील एक युवा नेता चांगलाच भडकला होता. मात्र वडिलांनी कान टोचताच हा युवा नेता आकसला. मात्र घडलेल्या घडामोडीमुळे त्याची चर्चा कागल तालुक्यात जोरदार होती.
दोन दिवसांपूर्वी हर्षल सुर्वे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्ष प्रवेश केला. मात्र यापूर्वी लोकसभा निवडणुकीत सुर्वे हे महाविकास आघाडीत होते. महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारार्थ सुर्वे आघाडीवर होते. प्रचारादरम्यान सुर्वे यांच्याकडून काही प्रतिकात्मक व्हिडिओ प्रचाराच्या निमित्ताने तयार करण्यात आले होते. महायुतीतील नेत्यांना हे व्हिडिओ चांगलेच जिव्हारी लागले होते. काहीअंशी खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या विजयात या व्हिडिओचा देखील वाटा होता असे म्हणायला हरकत नाही.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील झालेल्या राजे नाट्यामुळे हर्षल सुर्वे यांनी नुकताच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे नाराज झालेल्या एका महायुतीतील युवा नेत्यांना सुर्वे यांचा पक्षप्रवेश चांगलाच खटकला. लोकसभा निवडणुकीत केलेला प्रचार जिव्हारी लागल्याने सुर्वे यांच्या पक्षप्रवेशावर भूमिका मांडण्यासाठी या युवा नेत्यांकडून आणि काही प्रमुख कार्यकर्त्यांकडून पत्रकार परिषद घेण्याची घोषणा करण्यात आली. मंगळवारी सकाळी आठ वाजता ची वेळ या पत्रकार परिषदेला ठरविण्यात आली.
युवा नेते पत्रकार परिषद घेणार असल्याची कुणकुण वडिलांना लागली. त्यामुळे या युवा नेत्याचे कान वडिलांनी टोचले. त्यामुळे कार्यकर्त्यांना ही पत्रकार परिषद रद्द करण्याचे निरोप लवकर पोहोचवण्यात आले. शिवाय ही पत्रकार परिषद रद्द करण्याचे फोन माध्यम प्रतिनिधींना गेले. मात्र तोपर्यंत शिवसेनेतील युवा नेत्याची खदखद गावभर झाली होती. त्यानिमित्ताने अंतर्गत धुसफूस कायम असल्याची सांगितले जाते.
हर्षल सुर्वे हे नाराज असल्याचे कळताच त्यांना शिंदे गटात घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या. त्यांना तत्काळ मुंबईत बोलवून त्यांचा पक्ष प्रवेश झाला. शिंदे सेनेतीलच एका नेत्याने पुढाकार घेऊन पक्षप्रवेश केल्याने युवा नेत्यांच्या वडिलांची देखील अडचण झाली. त्यामुळे आपल्याच नेत्यांच्या पुढाकाराने हा पक्षप्रवेश झाल्याने आपल्या बाबतीत कोणताही गैरसमज होऊ नये, अशी समजूत वडिलांनी युवा नेत्याची काढली. त्यानंतर ही पत्रकार परिषद रद्द करण्यात आली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.