Ajit Pawar-Anna Hazare : अजित पवारांच्या अडचणी वाढणार; अण्णा हजारे देणार क्लोजर रिपोर्टला आव्हान

State Cooperative Bank Scam : राज्य सहकारी बॅंकेतील सुमारे पंचवीस हजार कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हा शाखेने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांना दिलासा दिला आहे.
Anna Hazare-Ajit Pawar
Anna Hazare-Ajit PawarSarkarnama

Mumbai, 14 June : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण, शिखर बॅंक गैरव्यवहार प्रकरणातील अतिरिक्त क्लोजर रिपोर्टला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) हे आव्हान देणार आहेत. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणात अजित पवार यांना क्लिन चीट दिली आहे.

राज्य सहकारी बॅंकेतील (शिखर बॅंक) सुमारे पंचवीस हजार कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हा शाखेने उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना दिलासा दिला आहे. या गैरव्यवहार प्रकरणाचे कोणतेही पुरावे आमच्याकडे नाहीत, असे मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने म्हटले होते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत अजित पवार, सुनेत्रा पवार आणि इतरांना मोठा दिलासा मिळाला होता.

अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्याविरोधात कोणतेही पुरावे नाहीत, असे सांगून मुंबई पोलिसांनी जानेवारीमध्ये न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर केला होता. त्याच प्रकरणातील क्लोजर रिपोर्टला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे.

शिखर बँक घोटाळा प्रकरणातल्या मुंबई पोलिसांच्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्टवर अण्णा हजारे आणि माणिकराव जाधव यांच्या वकिलांनी आक्षेप घेतला आहे. याच क्लोजर रिपोर्टला अण्णा हजारे आव्हान देणार आहेत.

Anna Hazare-Ajit Pawar
Pandharpur Politics : पंढरपूरचे नेते लागले आमदारकीच्या तयारीला...जनतेसाठी मोबाईल नंबरही जाहीर केला!

अजित पवार यांच्याशी संबंधित प्रकरणात अण्णा हजारे निषेध याचिका दाखल करणार आहेत. न्यायालयाने हा आक्षेप मान्य करत निषेध याचिका दाखल करण्यास हजारे आणि जाधव यांच्या वकिलांना वेळ देण्यात आला आहे. येत्या २९ तारखेला या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे.

Anna Hazare-Ajit Pawar
(Video) Praniti Shinde Pandharpur Tour : पहिल्याच कृतज्ञता मेळाव्यात भालके समर्थकांचा प्रणिती शिंदेंसमोर गोंधळ

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com