Hasan Mushrif : मुश्रीफांचे तोंड कोण दाबतय? राज्यसरकार की जिल्ह्यातील मित्र

Hasan Mushrif on Kolhapur Border Extension : कोल्हापूर शहरासह अनेक उपनगरांची अवस्था पाहता कोल्हापूरची हद्द वाढ व्हावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. मात्र यावर फक्त चर्चा होते. पण कोणताच निर्णय होत नाही.
Hasan Mushrif
Hasan MushrifSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News: कोल्हापूर शहरासह अनेक उपनगरांची अवस्था पाहता कोल्हापूरची हद्द वाढ व्हावी, अशी मागणी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही मागणी होत असून ही ती मान्य होत नाही. याचा फटका शहरवासीयांना बसत आहे.

मूलभूत सुविधांबरोबरच इतर गरजा ही पूर्ण करण्यासाठी आवश्यक इतका निधी मिळत नाही आणि केंद्र सरकारकडून निधी उपलब्ध होत नाही. यामुळे शहराची हद्दवाढ होणे आवश्यक आहे. केवळ निवडणूक पुरताच हा मुद्दा येत असल्याने आता कोल्हापूरकर आक्रमक झाले आहेत. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी काल केलेल्या विधानानंतर पुन्हा एकदा हद्दवाढ विरोधकावर संताप व्यक्त होत आहे.

मंत्री हसन मुश्रीफ यांनी हद्दवाढ विरोधात लोकप्रतिनिधी आडवे येतात, असे विधान केले आहे. या विधानानंतर आता आडवे येणाऱ्यांची नावे मुश्रीफ जाहीर करणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे मंत्री मुश्रीफ यांचे तोंड कोण दाबतय? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.

मुश्रीफ हे जिल्ह्यातील ज्येष्ठ मंत्री आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी मधील त्यांचा कामाचा अनुभव मोठा आहे. जिल्ह्यातील राजकारणाचे धागेदोरे आणि खडान् खडा त्यांना माहित आहे. मात्र हद्द वाढीसाठी त्यांच्याकडूनच बोटचेपीची भूमिका घेतली जात असल्याचे चित्र आहे. शहराचे प्रश्न सोडवण्यासाठी हद्दवाढ हा एकमेव पर्याय असताना मुश्रीफ यांच्याकडून इतरांवर जबाबदारी झटकण्याचे काम सुरू असून ते खूद्द आपले हात वर करत आहेत.

यापूर्वी देखील आघाडी सरकारच्या काळात मुश्रीफ हे मंत्री होते. शिवाय त्यापूर्वी देखील महानगरपालिकेत सत्ता होती. त्यांनी ठरवले असते तर कदाचित महापालिकेची हद्द वाढ त्याचवेळी झाली असती. मात्र सोईस्कर राजकारण लक्षात घेऊन तेरी भी चूप और मेरी भी चुप हीच भूमिका मुश्रीफ यांनी घेतली.

Hasan Mushrif
Hasan Mushrif : विदर्भात धाडलेल्या हसन मुश्रीफांना अजूनही कोल्हापूरचा मोह? म्हणतात, 'जनतेचा पालकमंत्री मीच..!'

महायुती सरकारच्या काळात 14 महिने कोल्हापूरच्या पालकमंत्री पदावर मुश्रीफ राहिले होते. वास्तविक पाहता कागल विधानसभा मतदारसंघातील ते आमदार होते. त्यामुळे राजकीय फटका त्यांना बसला नसता. कोल्हापूर शहरांमधून राष्ट्रवादीला या निर्णयामुळे बळ मिळाले असते. पालकमंत्री पदाच्या या काळात त्यांनीच शहराला लागून असलेल्या पाच गावांसह हद्दवाढीचा प्रस्ताव तयार करण्याची सूचना प्रशासनाला केली होती. पण पुढे काहीही झाले नाही.

स्वतः हद्दवाढीच्या बाजूने असूनही प्रत्यक्षात त्यांची कृती झाली नाही. मनात असूनही सहकारातील मैत्री त्यांच्या आड आली. दोन दिवसांपूर्वी मुश्रीफ यांनी हद्दवाढीच्या आडवे लोकप्रतिनिधीच येतात, अशी टिपण्‍णी केली.

Hasan Mushrif
Sunil Tatkare to Hasan Mushrif : 'मंत्री मुश्रीफसाहेब फोन थांबवा'; तटकरे भर मंचावरून अचानक असं का म्हणाले?

आता हे लोकप्रतिनिधी कोण आहेत, त्यांची नावेही त्यांनी जाहीर करावीत. किंबहुना त्या लोकप्रतिनिधींना जाब विचारता येईल. हद्दवाढीला कोल्हापूर दक्षिण आणि करवीर विधानसभा मतदारसंघातील लोकप्रतिनिधींचा विरोध आहे. या दोन्ही मतदारसंघातील आजी-माजी मुश्रीफ यांचे मित्र आहेत. सध्या महायुतीत एकत्र आहेत. तर आघाडी काळात देखील त्यांचे मित्र राहिले आहेत. त्यामुळे मुश्रीफ यांचे तोंड कोण दाबतय? याची चर्चा आता कोल्हापुरात सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com