Hasan Mushrif news : मुख्यमंत्र्यांसमोरच मुश्रीफांनी महाडिक, नरकेंना सुनावलं; कोल्हापूरच्या हद्दवाढीचा मुद्दा उकरून काढला...

Devendra Fadnavis, Amal Mahadik, Chandradip Narke, Kolhapur boundary expansion : कोल्हापूर शहर हद्दवाढीशिवाय विकास अशक्य, महाडिक-नरकेंनी सहकार्य करावे; मुख्यमंत्र्यांसमोर मुश्रीफांनी विषय काढला.
Maharashtra CM Devendra Fadnavis listens as Hasan Mushrif raises the long-pending Kolhapur city boundary expansion issue, with Amal Mahadik and Chandradip Narke also present.
Maharashtra CM Devendra Fadnavis listens as Hasan Mushrif raises the long-pending Kolhapur city boundary expansion issue, with Amal Mahadik and Chandradip Narke also present.Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur news : गेल्या अनेक वर्षे कोल्हापूरच्या विकासासंदर्भात गाजत असलेला हद्दवाढीचा विषय पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मंत्री हसन मुश्रीफ यांनी उकरून काढला. थेट मुद्द्यालाच हात घालत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोरच महायुतीतील भाजप आणि शिवसेनेच्या विद्यमान आमदारांचे कान टोचत विनंती केली. मंत्री मुश्रीफ यांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या समोरच हद्दवाढीला सहकार्य करण्याचं आवाहन केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

कोल्हापूर शहराची हद्दवाढ झाल्याशिवाय कोल्हापूर शहराची प्रगती होणार नाही. आमदार चंद्रदीप नरके, अमल महाडिक यांनी सहकार्य करावं, यांना एवढी विनंती मी करतो, असे मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्‍यांसमोरच म्हटले. अनेक वर्षांपासून कोल्हापूर शहराची एक इंचाने सुद्धा हद्दवाढ झालेली नाही, त्यामुळे विकास कामात अडचण येत आहे. महायुतीतील दोन आमदारांचाच हद्दवाढीचाला विरोध होत असताना थेट मुश्रीफ यांनी पुढाकार घेत हद्दवाढीच्या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.

छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयामध्ये आपण अनेक सुविधा नव्याने आणलेल्या आहेत. शेंडा पार्कमध्ये साकारत असलेल्या नवीन सीपीआर हे अमेरिकेच्या ह्युस्टन शहराच्या आधारित एक मेडिकल हब बनवत आहे. एक-दोन वर्षांनी कोल्हापूर शहर, कर्नाटक आणि आपल्या कोकणातील कुठल्याही माणसाला मुंबईला आणि पुण्याला जायला लागणार नाही, अशी व्यवस्था मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांच्या सहकार्याने मी करून दाखवेन, असे मुश्रीफ म्हणाले.

Maharashtra CM Devendra Fadnavis listens as Hasan Mushrif raises the long-pending Kolhapur city boundary expansion issue, with Amal Mahadik and Chandradip Narke also present.
BJP MLA Case : धक्कादायक : भाजप आमदाराने लेकीचं धडाक्यात लग्न लावलं, पण काही महिन्यांत बसला हादरा; जावयाची तब्बल 25 लग्न, मुंबईत उद्योग असल्याचा बनाव

राज्य सरकारच्या मदतीने 473 कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिला आहे. शेंडा पार्कमध्ये 600 बेडचे सामान्य, 2500 बेडचे कॅन्सर आणि 2500 बेडचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे साकारत आहे. एमबीबीएस, एमडी, एमएस या शिकणाऱ्या सगळ्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची एक अतिशय चांगली व्यवस्था त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न असल्याचेही मुश्रीफ यांनी सांगितले.

Maharashtra CM Devendra Fadnavis listens as Hasan Mushrif raises the long-pending Kolhapur city boundary expansion issue, with Amal Mahadik and Chandradip Narke also present.
CJI Surya Kant news : 'कॉक्रोच'चे साईडइफेक्ट; सरन्यायाधीशांच्या हातून पदवी घेण्यास नकार, कोणत्या विद्यार्थ्यांनी केलं असं धाडस?

दरम्यान, आता मुश्रीम यांनी थेट मुख्यमंत्र्‍यांसमोरच हद्दवाढीचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर महाडिक आणि नरके काय भूमिका घेणार याबाबत उत्सुकता वाढली आहे. अद्याप त्यांच्याकडून मुश्रीफांच्या विधानावर प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. त्यांच्या भूमिकेवर कोल्हापूरच्या हद्दवाढीचा विषय पुढे जाणार की रेंगाळणार हेही पाहणे महत्वाचे असेल.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com