Hasan Mushrif News : अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच (ईडी) राष्ट्रवादी काँग्रेस (Ncp) पक्षाचे नेते हसन मुश्रीफ यांच्या मुलांच्या अटकपूर्व जामीन अर्जाला विरोध केला आहे. अशा आशयाचं लेखी उत्तर ईडी ने गुरूवारी सत्र न्यायालयात सादर केले. गुरूवारी त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी दरम्यान ईडीने मुश्रीफ बंधुंच्या अटकपूर्व जामीन मंजूर करण्यास विरोध दर्शवला.
अटकपूर्व जामीन दिल्यास तपासावर परिणाम होईल असा युक्तिवाद करत पी. चिदंबरम यांच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा संदर्भ यावेळी कोर्टात देण्यात आला. सोबतच ईडीने तपासात पुरेसे स्वातंत्र्य देण्याची मागणी केली. दोन वेळा समन्स देऊनही नाविद मुश्रीफ हे ईडी समोर चौकशीसाठी हजर न झाल्याने यावेळी ईडी ने कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं.
PMLA कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाल्या नंतर मुश्रीफ यांची मुले नाविद, आबिद आणि साजिद मुश्रीफ यांनी मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. राजकीय हेतून अटकेच्या धमक्यांचा वापर केला जात असल्याचा या अर्जात उल्लेख करण्यास आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.