

Kolhapur Politics : नगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर कागल तालुक्यातील मंत्री हसन मुश्रीफ आणि माजी खासदार संजय मंडलिक यांच्यातील वाद आणखी चिघळला आहे. कागलमध्ये मंत्री मुश्रीफ-घाटगे आणि मुरगुडमध्ये माजी खासदार संजय मंडलिक-पाटील यांच्या गटाने विजय मिळवल्यानंतर एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांचा खेळ रंगला आहे.
मंत्री हसन मुश्रीफ यांच्याबद्दल मला काहीच बोलायचे नाही. कारण मी काही त्यांच्या विचारांवर राजकारण करत नाही. मुश्रीफ काय हिटलर लागून गेले नाहीत. मुश्रीफ यांच्याबद्दल विचारू नका, अशी टीका माजी खा. संजय मंडलिक यांनी पत्रकारांशी बोलताना रविवारी केली. यावर मंत्री हसन मुश्रीफ यांनी लगेचच प्रत्युत्तर दिले आहे.
मुश्रीफ म्हणाले, खरं दुःख त्यांना मी आणि समरजीत घाटगे एकत्र आल्याचं दिसून येत आहे, ती त्यांची जखम अजून काय जात नाही. त्यातून त्यांनी उद्गार केले असावेत. राजकारणात मी गेल्या 40 वर्षापासून आहे, अनेकांशी संघर्ष करण्याची वेळ आलेली आहे. पण संघर्ष करत असताना आपण कशा पद्धतीने बोलावं याचे तारतम्य असावं लागतं. पण त्यांच्या भूमिकेला ते लखलाभ, त्यांच्यावर मी वाईट बोलणार नाही. असा टोला मंत्री हसन मुश्रीफ यांनी लगावला.
मी काय हिटलर नाही, मी लोकांचा सेवेकरी आहे. लोकांची सेवा करूनच आतापर्यंत मी मोठा झालो आहे. इतक्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत मला कधी मस्ती आली नाही. आमच्या बापजादाची आम्हाला पुण्याई नव्हती. ना आमचे वडील आमदार–खासदार होते. सामान्य कुटुंबातून आम्ही वर आलो आहोत. जनतेच्या पाठबळावर आणि कार्यकर्त्यांच्या श्रमावर आपण मोठे झालेले कार्यकर्ते आहोत.
मी माझ्या मर्यादा कधीही ओलांडलेल्या नाही. गेल्या अनेक वर्षापासून मी मंत्री आहे पण आपल्या बोलण्यात, चालण्यात, वागण्यात, कृतीमध्ये कधीही असा अहंभाव दाखवलेला नाही, मस्ती कधी केलेली नाही. असेही हसन मुश्रीफ म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.