Kolhapur News : करवीरच्या जनतेनं कधीही जातीयवादी विचारधारेला थारा दिलेला नाही. शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार टिकविण्यासाठी श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांना ( Shahu Chhatrapati ) दिल्लीला पाठवा. जातीयवादी विचारसरणीच्या थोबाडीत मारण्याची ही संधी आहे. या निवडणुकीतून येथील पुरोगामित्व पुन्हा एकदा सिद्ध करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( Jayant Patil ) यांनी केले.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील ( Kolhapur Lok Sabha Constituency ) काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज ( Shahu Chhatrapati ) यांच्या प्रचारार्थ 'इंडिया' आघाडी व 'महाविकास आघाडीच्या'वतीने रविवारी ( 7 मार्च ) वज्रमूठ सभा महासैनिक दरबार हॉल येथे झाली. तेव्हा जयंत पाटील बोलत होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
"फडणवीस शिंदे गट व राष्ट्रवादीचे उमेदवार ठरवतात"
"सामान्यांना लुटून केंद्र सरकारने रोषणाई चालविली आहे. दोन पक्ष फोडण्याचे पाप सरकारने केले. फुटून गेलेल्यांवर आरोप असून ते मांडीला मांडी लावून बसताना लाज वाटत नाही. देवेंद्र फडणवीस, शिंदे गट व राष्ट्रवादीचे उमेदवार ठरवतात. मांडलिकत्व स्वीकारले की असेच होते. दोघेही आमच्यात होते, त्यावेळी रुबाब, आत्मसन्मान, स्वाभिमान, ठामपणा होता. तिथे गेल्यावर हात जोडून उभे राहतात याचे वाईट वाटते," अशी टोलेबाजी जयंत पाटलांनी ( Jayant Patil ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केली आहे.
"प्रत्येक तालुक्यात खासदारांचे स्वतंत्र कार्यालय"
आमदार सतेज पाटील ( Satej Patil ) म्हणाले, "देशांमधील गढूळ वातावरणात विचारांची लढाई कोल्हापूरच्या मातीतून लढली गेली पाहिजे आणि त्याचे सामर्थ्य फक्त श्रीमंत शाहू महाराजांमध्ये होते. ते लढाईमध्ये सहभागी झाले. राजर्षी शाहू महाराजांच्या कामांच्या उपकाराची परतफेड कोल्हापूरकर करतील. विजयानंतर महिन्यात प्रत्येक तालुक्यात खासदारांचे स्वतंत्र कार्यालय असेल व तेथील कामांचे नियोजन तेथूनच केले जाईल. ही अस्मिता, स्वाभिमानाची लढाई असून भाजपची मंडळी येतील तेव्हा गेल्या दहा वर्षांतील विविध आश्वासनांच्या पूर्ततेचे उत्तर द्या, मगच पाऊल टाका, असे खडसावं लागेल."
"लोकशाही मजबूत करण्याची गरज"
"एकाधिकारशाहीतून हुकूमशाही येते. त्याला अटकाव करण्यासाठी लोकशाही मजबूत करण्याची गरज आहे. ज्यावेळी चांगले घडत नाही, त्यावेळी परिवर्तन झाल्याशिवाय राहात नाही. त्यासाठी मतदान करायला हवे," असं आवाहन सतेज पाटलांनी केलं.
"कोल्हापुरात सतेज पाटलांची गॅरंटी"
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी अनिल घाटगेंनी म्हटलं, "देशात विचित्र परिस्थिती आहे. देश हुकूमशाहीकडे चालला आहे. देशभर मोदी की गॅरंटी असा प्रचार सुरू आहे. मात्र, कोल्हापुरात सतेज पाटील यांची गॅरंटी चालते."
( Edited By : Akshay Sabale )
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.