Hatkanangale Nagar Panchayat Election : अर्ज बाद झाल्यानं हातकणंगले नगरपंचायतीच्या निवडणुकीतून दोघेजण बाहेर; काँग्रेस अन् भाजपात लढत...

Hatkanangale Nagar Panchayat By Election : नगराध्यक्ष अरुण जानवेकर यांच्या निधनानंतर या पदासाठी बिनविरोध निवड करण्याच्या हालचाली सुरू होत्या. पण, भाजपनं उमेदवार दिल्यानं निवडणूक होणार आहे.
hatkanangale nagar panchayat.jpg
hatkanangale nagar panchayat.jpgsarkarnama
Published on
Updated on

हातकणंगले नगरपंचायतीत दोघांचं नगराध्यक्ष होण्याचं स्वप्न भंगले आहे. जात पडताळणीचा अर्ज अवैध धरल्याने दोघांचे अर्ज बाद करण्यात आले. नगराध्यक्ष अरुण जानवेकर यांच्या निधनानंतर या पदासाठी बिनविरोध निवड करण्याच्या हालचाली सुरू होत्या. पण, भाजपनं नगराध्यक्षपदासाठी उमेदवार उतरविला.

नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीसाठी छानणीत संजय चौगुले व रामदास पांडव या दोघांचा अर्ज बाद करण्यात आले आहेत.

छानणीत अखेर एकूण पाच जणांचे सहा अर्ज शिल्लक राहिले आहेत. त्यात काँग्रेसतर्फे ( Congress ) अर्चना अरुणकुमार जानवेकर तर भारतीय जनता पार्टीकडून उज्वला विजय कांबळे या प्रमुख उमेदवारांचा समावेश आहे. आजपासून 31 तारखेपर्यंत अर्ज माघार घेण्याची मुदत आहे त्यानंतरच खरे चित्र स्पष्ट होईल.

एकाहून अधिक अर्ज दाखल झाल्याने निवडणूक बिनविरोध करण्याच्या प्रयत्न फसला. शेवटच्या क्षणापर्यंत स्थानिक नेत्यांनी ही निवडणूक बिनविरोध करण्याची भूमिका मांडली होती. त्यादृष्टिकोनातून हालचाली झाल्या होत्या. मात्र, शेवटच्या दिवशी या सर्व भूमिकेला बगल देत आठ अर्ज दाखल झाल्याने राजकीय समीकरणे आणि दिलेल्या वचनांबाबत उलट सुलट चर्चा हातकणंगले नगरपंचायतीत सुरू आहेत.

hatkanangale nagar panchayat.jpg
Hasan Mushrif News: 'देवदर्शना'नंतर पालकमंत्री मुश्रीफ 'अ‍ॅक्शन मोड'वर; 'पूर'संकटावर मात करण्यासाठी प्रशासनासह मैदानात

दिवंगत नगराध्यक्ष अरुणकुमार जानवेकर यांच्या पत्नी अर्चना जानवेकर यांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी सर्वपक्षीयांमध्ये काही दिवसांपूर्वी चर्चा झाली होती. पण, भाजपनं ( bjp ) आपला उमेदवार मैदानात उतरविल्यानं चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

सतेज पाटील गटाचा प्रयत्न फसला

अर्चना जानवेकर यांना बिनविरोध करण्याच्या हालचाली सतेज उर्फ बंटी पाटील यांनी सुरू केल्या होत्या. तसा शब्दही त्यांनी अनेक स्थानिक नेत्यांना दिला होता. मात्र, भाजपने उमेदवार दिला. यासह आणखी काही जणांनी अर्ज दाखल केले.

( Edited By : Akshay Sabale )

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com