Hatkangle constituency 2024 : हातकणंगलेत धैर्यशील मानेंचं टेन्शन वाढलं, तिसऱ्या फेरीत सत्यजित पाटलांची मुसंडी

Dhairyasheel Mane Vs Satyjeet Patil Sarudakr News : लोकसभा मतदारसंघात महायुतीची उमेदवार धैर्यशील माने, महाविकास आघाडीचे सत्यजित पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या तिरंगी लढत झाली.
Dhairyashil Mane, Raju Shetti-Satyajeet Patil
Dhairyashil Mane, Raju Shetti-Satyajeet PatilSarkarama

Hatkangale News : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरूडकर यांच्यात कांटे की टक्कर पाहायला मिळत आहे. आतापर्यंत तिसऱ्या फेरीपर्यंतचे कल हाती आले आहेत. तिसऱ्या फेरीअखेर कधी धैर्यशील माने पुढे तर कधीच सत्यजित पाटील सरूडकर हे आघाडीवर जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे खासदार धैर्यशील माने यांचे टेन्शन वाढले आहे.

सायंकाळपर्यंत संपूर्ण निकाल हाती येईल. पण तिसऱ्या फेरी अखेर आलेल्या निकालाने उमेदवारांसह कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली आहे. या लोकसभा मतदारसंघात महायुतीची उमेदवार धैर्यशील माने (Dhiryasheel Mane), महाविकास आघाडीचे सत्यजित पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या तिरंगी लढत झाली.

तिसऱ्या फेरी अखेर पाटील हे आघाडीवर आहेत. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetty) हे तिसऱ्या स्थानावर आहेत. सकाळी आठ वाजता टपाली मतदानाला सुरुवात झाल्यानंतर खासदार धैर्यशील माने आघाडीवर होते.

ईव्हीएम मधील मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या फेरीत सत्यजित पाटील सरूडकर हे 88 मतांनी आघाडीवर होते. दुसऱ्या फेरी अखेर धैर्यशील माने यांनी जवळपास 800 मतांची आघाडी घेतली.

Dhairyashil Mane, Raju Shetti-Satyajeet Patil
Nagpur constituency 2024 : भाजपची चिंता वाढली; गडकरींना किरकोळ लीड, दिग्गज नेतेही बॅकफुटवर

तिसऱ्या फेरी अखेर पुन्हा सत्यजित पाटील सरूडकर यांनी 4463 मतांची आघाडी घेतली आहे. त्यामुळे या मतदारसंघातील लढतीकडे कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले असून दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली आहे.

(Edited By : Sachin Waghmare)

Dhairyashil Mane, Raju Shetti-Satyajeet Patil
Lok Sabha Election 2024 Result : मोदी 350+, राहुल गांधींच्या ‘हाता’ची घडी; पुन्हा भाजपराज?

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com