Vighnahar Sugar factory : 'विघ्नहर'वर सत्यशील शेरकरांचे एकहाती वर्चस्व; शेरकरांच्या तीन पिढ्यांची कारखान्यावर 40 वर्षांपासूनची सत्ता कायम!

Satyasheel Sherkar News : विघ्नहर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, उपाध्यक्ष अशोक घोलप यांच्यासह तब्बल 12 संचालकांना पुन्हा एकदा करखान्यावर संधी मिळाली आहे. तीन माजी संचालकांना पुन्हा एकदा निवडून दिली आहे, तर सहा संचालकांना पहिल्यांदाच संधी मिळाली आहे.
Vighnahar Sugar factory-Satyasheel Sherkar
Vighnahar Sugar factory-Satyasheel SherkarSarkarnama
Published on
Updated on

Junnar 16 March : तब्बल चाळीस वर्षांची सत्ता राखताना श्री विघ्नहर सहकारी साखर काखान्याच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी सलग तीनदा विजय मिळवित हॅट्‌ट्रीक साधली आहे. शेरकर यांच्या नेतृत्वाखालील शिवनेर पॅनेलने कारखान्यावर एकहाती सत्ता मिळविली आहे. विघ्नहर कारखान्यावर स्थापनेपासून म्हणजेच तब्बल 40 वर्षांपासून शेरकर कुटुंबीयांची सत्ता आहे. सत्यशील यांच्या अगोदर त्यांचे वडिल सोपानशेठ शेरकर आणि आजोबा निवृत्तीशेठ शेरकर यांनी विघ्नहर कारखान्याचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे.

जुन्नर तालुक्यातील (Junnar Taluka) धालेवाडीच्या निवृत्तीनगर येथील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत संचालकांच्या एकूण २१ जागांपैकी १७ जागा अगोदरच बिनविरोध झाल्या होत्या. काही सभासदांच्या हट्टापायी उर्वरीत तीन जागांसाठी निवडणूक झाली होती. त्यात अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या शिवनेर पॅनेलचे चारही उमेदवार आज मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. 

विघ्नहर साखर कारखान्याचे (Vighnahar Sugar factory) अध्यक्ष सत्यशील शेरकर, उपाध्यक्ष अशोक घोलप यांच्यासह तब्बल १२ संचालकांना पुन्हा एकदा करखान्यावर संधी मिळाली आहे. तीन माजी संचालकांना पुन्हा एकदा निवडून दिली आहे, तर सहा संचालकांना पहिल्यांदाच संधी मिळाली आहे.

शिरोली गटातील ऊस उत्पादक मतदार संघाच्या तीन जागांसाठी निवडणूक लागली होती. त्यात शिवनेर पॅनेलचे प्रमुख तथा कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर(१० हजार ४२३), सुधीर खोकराळे   (१० हजार ०५७) व संतोष खैरे (१० हजार ०२५) मते मिळवून विजयी झाले. इतर मागासवर्गीय मतदार संघाच्या एका जागेसाठी तीन उमेदवार रिंगणात होते, यामध्ये सुरेश गडगे हे ९ हजार ९२० मते मिळवून बाजी मारली आहे. त्यांच्या विरोधात नीलेश भुजबळ (२२१) आणि रहेमान इनामदार (११६) होते, त्यांना पराभूत व्हावे लागले. निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी ही याबाबतची माहिती दिली.

Vighnahar Sugar factory-Satyasheel Sherkar
Vidhan Parishad Election : ठाण्याच्या माजी महापौरांसह ही चार नावे शिवसेनेकडून आघाडीवर; कुणाला लागणार लॉटरी

श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत शेरकर यांच्या नेतृत्वाखालील शिवनेर पॅनेलमध्ये सर्वपक्षीय नेतेमंडळीचा समावेश आहे. सर्वच पक्षांनी शेरकर यांना पाठिंबा दिला होता, त्यामुळे शेरकर यांचे कारखान्यावर पुन्हा एकदा वर्चस्व राहाणार, हे स्पष्ट झाले होते. सत्यशील शेरकर यांच्या रुपाने शेरकर कुटुंबाची तिसरी पिढी कारखान्यावर कार्यरत आहे.

सत्यशील शेरकर हे स्वतः २०१३ पासून काखान्याचे अध्यक्ष असून त्यांचे पिताश्री सोपानशेठ शेरकर हे त्यापूर्वी अध्यक्ष होते. सत्यशील शेरकर यांचे आजोबा निवृत्तीशेठ शेरकर हे काखान्याचे संस्थापक अध्यक्ष आहेत, त्यामुळे शेरकरांची तिसरी पिढी कारखान्यावर वर्चस्व राखून आहे.

विघ्नहर कारखान्याचे बिनविरोध निवडण्यात आलेले संचालक

ऊस उत्पादक सभासद प्रतिनिधी मतदार संघ जुन्नर गट (तीन जागा) : देवेंद्र खिलारी, अशोक घोलप, अविनाश पुंडे

ओतूर गट (चार जागा) : बाळासाहेब घुले, धनंजय डुंबरे, पंकज वामन, रामदास वेठेकर

पिंपळवंडी गट (तीन जागा) : विवेक काकडे, प्रकाश जाधव, विलास दांगट

घोडेगाव गट (तीन जागा) : यशराज काळे, दत्तात्रेय थोरात, नामदेव थोरात

अनुसूचित जाती-जमाती मतदार संघ (एक जागा) : प्रकाश सरोगदे

भटक्या विमुक्त जाती-जमाती मतदार संघ (एक जागा) : संजय खेडकर

महिला राखीव(दोन जागा) : नीलम तांबे, पल्लवी डोके

Vighnahar Sugar factory-Satyasheel Sherkar
Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीत भाजपकडून विदर्भाला झुकते माप; पश्चिम महाराष्ट्रावर अन्याय

दुसऱ्यांदा संधी ते नवखे संचालक

कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, उपाध्यक्ष अशोक घोलप आदींसह देवेंद्र खिलारी, संतोष   खैरे, धनंजय डुंबरे, विवेक काकडे, यशराज काळे, नामदेव थोरात, दत्तात्रेय थोरात, प्रकाश सरोगदे, नीलम तांबे, पल्लवी डोके या विद्यमान संचालकांना पुन्हा एकदा संधी मिळाली आहे. अविनाश पुंडे, बाळासाहेब घुले, पंकज वामन, रामदास वेठेकर, संजय खेडकर, सुधीर खोकराळे प्रथमच निवडून आले आहेत, तर माजी संचालक प्रकाश जाधव, विलास दांगट, सुरेश गडगे यांना नव्याने संचालकपदाची संधी मिळाली आहे

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com