Hindu Jagruti Sabha : मुरलीधर जाधवांच्या सभेतून ठाकरेंचा फोटो गायब; तर रोहित पवारांच्या मागणीने सभा वादाच्या भोवऱ्यात

Muralidhar Jadhav : काही दिवसांपूर्वी मुरलीधर जाधव यांना जिल्हाप्रमुखपदावरून हटवण्यात आले होते.
Muralidhar Jadhav
Muralidhar JadhavSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांना महाविकास आघाडीच्या कोट्यातून उमेदवारी देण्यास विरोध केल्यानंतर जिल्हाप्रमुख पदावरून ठाकरे गटाच्या मुरलीधर जाधव यांना हटवण्यात आले. आमदार आदित्य ठाकरे यांच्या मेळाव्यालाही अनुपस्थित राहिलेल्या मुरलीधर जाधव यांनी हुपरीमध्ये आज हिंदू सभेचे आयोजन केले आहे. या सभेच्या पोस्टरवरून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना हटवले आहे. (Hindu Jagruti Sabha Kolhapur)

उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो पोस्टरवर नसल्याने याची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. यातच आता आमदार रोहित पवार यांनी केलेल्या एका वेगळ्या मागणीमुळे ही सभा होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. आमदार रोहित पवार यांनी या सभेला सरकारने परवानगी देऊ नये, अशी मागणी केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Muralidhar Jadhav
Bhandara Encroachment News : अतिक्रमण प्रकरण भोवले; सिल्ली येथील सरपंच तर चिचाळचे 3 ग्रामपंचायत सदस्य अपात्र !

हुपरी येथे होणाऱ्या हिंदू सभेसाठी आज तेलंगणा राज्यातील भाग्यनगरचे हिंदूत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह, हिंदू प्रवक्ते रमेश शिंदे उपस्थित राहणार आहेत. मात्र त्यावरूनही नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. रोहित पवार यांनी या कार्यक्रमाला विरोध केला असून, या कार्यक्रमाची परवानगी नाकारावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

कोल्हापुरात तेलंगणाचे आमदार टी. राजासिंह यांच्या कार्यक्रमाला परवानगी देऊ नका, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी 'एक्स'हँडलवरून केली आहे. त्यांनी म्हटले की, हुपरी येथे या हिंदूधर्म जागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रतिगामी शक्तींकडून वैचारिक आक्रमण करून राजर्षी शाहूमहाराजांच्या नगरीतील वातावरण दूषित करण्याचा सूर असल्याचा आरोप यावेळी रोहित पवार यांनी केला.

टी. राजासिंह प्रक्षोभक भाषणे करतात, त्यामुळे त्यांच्या कार्यक्रमाला परवानगी देऊ नये, अशी भूमिका रोहित पवारांची आहे. दरम्यान, रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केलेल्या या मागणीवर आता सरकार काय भूमिका घेतं, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

(Edited By-Ganesh Thombare)

R...

Muralidhar Jadhav
Satara Political News : माजी सहकारमंत्र्यांनी न्यायालयीन लढाई जिंकली; विकासकामांवरील स्थगिती उठली...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com