Chandgad Assembly Election : महाराष्ट्राने एवढी अटीतटीची लढत पहिल्यांदाच पाहिली; केवळ अकरा मतांनी माजी मंत्री पराभूत

History of Chandgad Vidhan Sabha Constituency : नरसिंगराव पाटील विरुद्ध माजी मंत्री भरमुअण्णा पाटील यांच्यातील झालेली लढत इतकी अटीतटीची होती की केवळ अकरा मतांनी नरसिंगराव पाटील यांचा विजय झाला तर, भरमु अण्णा पाटलांचा पराभव झाला.
Bhamruanna Patil Narasingrao Patil
Bhamruanna Patil Narasingrao PatilSarkarnama
Published on
Updated on

Chandgad News : चंदगडच्या विधानसभा निवडणुकीत केवळ अकरा मतांनी झालेला पराभव आणि विजय हा जिल्ह्यात आजही चर्चेचा विषय ठरला आहे. नव्या कोऱ्या पक्षाने चंदगड विधानसभा मतदारसंघातील दिलेली टक्कर आज ही अटीतटीच्या लढाईत महत्त्वपूर्ण मानली जाते. तसाच चंदगड विधानसभा मतदारसंघ हा दुर्गम मानला जातो.

वाड्या वस्त्यांवरील हा मतदारसंघावर कोणाचे वर्चस्व आहे. हे फक्त मत पेटीतूनच उघड होतं. अशातच कै. नरसिंगराव पाटील विरुद्ध माजी मंत्री भरमुअण्णा पाटील यांच्यातील झालेली लढत इतकी अटीतटीची होती की केवळ अकरा मतांनी नरसिंगराव पाटील यांचा विजय झाला तर, भरमु अण्णा पाटलांचा पराभव झाला.

1999 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आले. यावेळी चंदगडमधून नरसिंगराव पाटील यांनी विजय मिळवला. त्यामुळे सहाजिकच 2004 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनाच संधी मिळेल अशी शक्यता होती.

मात्र नरसिंगराव पाटील यांचं मंत्रीपद नाकारल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. त्यावेळी त्यांनी जनसुराज्य पक्षांकडून विधानसभा निवडणूक (Vidhan-sabha Election) लढवली. 2004 मध्येच वारणा समूहाचे विनय कोरे यांनी जनस्वराज्य पक्षाची स्थापना केली होती.

Bhamruanna Patil Narasingrao Patil
Kolhapur Politics : कोल्हापूर उत्तरेत 'मविआ'चा उमेदवार ठरेना; मधुरिमाराजे-मालोजीराजेंचीही माघार

नव्या कोऱ्या पक्षाकडून उमेदवारी मिळवणं आणि लढवणं हे मोठे आव्हान नरसिंगराव पाटील यांच्यासमोर होते. त्यावेळी शिवसेनेकडून (Shivsena) भरमुआण्णा पाटील विरुद्ध जनसूराज्याचे नर्सिंगराव पाटील असा सामना झाला. या लढतीत 11 मतांनी ते विजयी झाले. त्यांच्या विरोधात शिवसेनेकडून लढलेले माजी मंत्री भरमू पाटील हे पराभूत झाले.

दिवंगत खासदार लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांचे नरसिंग राव हे व्याही होते. जिल्ह्याच्या राजकारणात जी मंडलिकांची भूमिका तीच नरसिंगराव पाटलांची होती. ज्यावेळी मंडलिकांनी शरद पवार यांची साथ सोडली त्याचवेळी नरसिंगराव पाटलांनी देखील पवारांची साथ सोडली.

Bhamruanna Patil Narasingrao Patil
Solapur Politics : सोलापूर शहर मध्य मतदारसंघाबाबत आडम मास्तर प्रचंड आशावादी;पण...

2004 च्या निवडणुकीत कै. नरसिंगराव यांना राष्ट्रवादीची उमेदवारी नाकारली व डॉ. कोरे यांच्या ‘जनसुराज्य’ची उमेदवारी स्वीकारली. त्यावेळी रिंगणात दहा उमेदवार होते. माजी मंत्री भरमू पाटील हे शिवसेनेकडून, तर राष्ट्रवादीकडून कै. नरसिंगराव यांचे मेहुणे गोपाळराव पाटील रिंगणात उतरले होते.

दरम्यान या निकालाला कोर्टात आव्हान दिले होते. जिल्ह्याच्या राजकारणात हा निकाल म्हणजे एक मैलाचा दगड होता. निकाल लागेपर्यंत

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com