Vishal Patil : पुढच्या 2029 च्या निवडणुकीत पुन्हा खासदार असू की नाही, याची खात्री नाही : विशाल पाटील असं का बोलले?

Sangli Political News : विशाल पाटील यांनी महिलांच्या राजकारणातील वाढत्या सहभागावर भाष्य करत पंचायत राजमधील आरक्षणाचे श्रेय राजीव गांधींना दिले. 33 टक्के आरक्षणामुळे पुढील निवडणुकांवर परिणाम होईल, असेही त्यांनी म्हटले.
Vishal Patil
Vishal Patil Sarkarnama
Published on
Updated on

Sangli, 27 March : कार्यक्रमाला येताना पाहिलं तर फक्त महिलाच दिसत होत्या. एवढ्या मोठ्या संख्येने महिला फक्त देवाचा कार्यक्रम असेल तरच येतात, नाही तर येत नाहीत. आज गावच्या नामकरणाच्या कार्यक्रमात पुरुषांपेक्षा महिलांचा सहभाग जास्त दिसत आहे, त्यामुळे महिलांना त्याचा आनंद जास्त झालेला दिसतोय. राजीव गांधी यांनी पंचायत राजमध्ये महिलांना आरक्षण दिलं, त्यानंतर आता ३३ टक्के आमदार, खासदारसुद्धा महिलाच होणार आहेत, त्यामुळे पुढच्या निवडणुकीत भैया (आमदार सुहास बाबर) आणि आम्ही असू की नाही, याची खात्री नाही, असे मजेशीर विधान खासदार विशाल पाटील यांनी केले.

सांगली (Sangli) जिल्ह्याच्या खानापूर तालुक्यातील मेंगाणवाडीचे नाव बदलून ते शिवशिवापूर असे करण्यात आले. त्या कार्यक्रमास महिलांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त होती. त्यावरून खासदार पाटील यांनी पुढच्या निवडणुकीत आपण खासदार असू की नाही, याची खात्री नाही, असे विधान केले. यावेळी व्यासपीठावर आमदार सुहास बाबर उपस्थित होते.

विशाल पाटील (Vishal Patil) म्हणाले, सांगली लोकसभा मतदारसंघ एवढा मोठा आहे की, त्यात ७५० ते ८०० गावं आहेत. त्यामुळे मतदारसंघातील प्रत्येक गावात जायचं म्हटलं तरी शक्य होत नाही. कारण आमचा वर्षातील सहा महिन्यांचा कालावधी दिल्लीत जातो.

दिल्लीत दोन ते तीन दिवसांतून एक भाषण करावं लागतं. त्यासाठी अभ्यास करावा लागतो. कायदा येणार असेल तर तो वाचून काढायचा, त्यातून वेगळा मुद्दा घ्यायचा. त्यात आपल्या मतदारसंघाचा एखादा मुद्दा घालायचा. जिल्हा आणि राज्याचा मुद्दा घालायचा, त्यामुळे सहा महिने दिल्लीत जातोच, असे खासदार पाटील यांनी स्पष्ट केले.

Vishal Patil
Mission Madha : पालकमंत्री गोरेंचे ‘मिशन माढा’; झेडपीची 3 सभापतिपदे नेली लोकसभा मतदारसंघात!

ते म्हणाले, सहा महिने मतदारसंघात राहून दररोज एक गाव करायचं म्हटलं तरी पाच वर्षांत ७०० ते ७५० गावुसद्धा होत नाहीत. आधीच तुमचं गाव दुकानदारीला बाहेर असल्यामुळे गावात दहा मिनिटं भेटली तर लय माणसं भेटली, असं होतंय.

Vishal Patil
Solapur ZP Sabhapati : सोलापूर झेडपीचे सभापती जाहीर : सातपुते, चिवडशेट्टी, वाघे, केदार-सावंत यांना लॉटरी

दिल्लीत माझं काल उशीरा भाषणं होतं. आज सकाळी लवकर विमान पकडून मुंबईला आलो. नशिबाने विश्वजित कदम यांना विनंती केल्यानंतर नशिबाने त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये आम्हाला जागा मिळाली आणि मला इथं येता आलं. बारा वाजता कडेगावला जाऊन लगेच परत आलो. कार्यक्रम चुकवायला नको, कारण एवढी सगळी लोकं तुम्ही कधी भेटणार. त्यानिमित्ताने पुढच्या निवडणुकीचा माझा प्रचार होऊन जाईल, हा स्वार्थ ठेवून पळत पळत आलो. आता पुन्हा मुंबईला जाऊन दिल्लीला जायचं आहे. कारण उद्याही अधिवेशन सुरू आहे, त्याठिकाणी मोठमोठे प्रश्न मांडायचे आहेत, असेही खासदार विशाल पाटील यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com