ZP politics : विशाल पाटलांच्या वक्तव्याने राजकारण तापलं: 'भाजपच्या अस्तित्वावर चिमटा काढला; चंद्रकांत पाटील म्हणतात, 'मी पुन्हा पुन्हा'

chandrakant patil Vs Vishal patil : सांगली जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेवरून राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये संघर्ष तीव्र पाहायला मिळत आहे. यादरम्यान काँग्रेसने भाजपला डिवचले असून जिल्ह्यात भाजपचे अस्तित्व दोन तालुक्यांपुरतेच मर्यादित असल्याची खरमरीत टीका केली आहे.
Chandrakant Patil And Vishal Patil
Chandrakant Patil And Vishal Patilsarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. ,सांगली जिल्हा परिषद अध्यक्षपद भाजपाचाच होईल, असा दावा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला.

    विरोधकांनी भाजपवर सत्तालोलुपतेचा आरोप करत जिल्हा परिषदेत जनतेने भाजपला नाकारल्याचे म्हटले.

    सांगली जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून जिल्ह्यातील राजकारण तापले असून दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

sangli zilla parishad politics : सांगली जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेचा तिढा दिवसेंदिवस वाढताना दिसत असून सत्ता स्थापनेवरून राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये संघर्ष तीव्र झाला आहे. तर भाजपने सर्वाधिक 18 जागा जिंकलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्याचा आखलेला प्लॅन फसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान भाजपकडून सर्व आयुधांचा वापर करत पालकमंत्री चंद्रकांत पाटील ‘व्हीप’चा धाक दाखवला होता. यावरून देखील राष्ट्रवादीत खदखद असतानाच आता सत्ता स्थापनेकडे काँग्रेसने डाव टाकल्याचे दिसत आहे.

काँग्रेस खासदार विशाल पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे अशी शक्यता निर्माण झाली आहे. त्यांनी, महापालिकेत जे झालं ते जिल्हा परिषदेत होणार नाही. भाजपचे अस्तित्व दोन तालुक्यांपुरतेच मर्यादित असल्याचे म्हणत पराभवाची सवय लावून घ्या, असा सल्ला त्यांनी भाजपला दिला आहे. दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी देखील यावर अधिकचे भाष्य न करता जिल्हा परिषदेत भाजपचाच अध्यक्ष होईल असा दावा केला आहे.

सांगली जिल्हा परिषदेवर महायुतीकडे काठावरच बहुमत असून भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मदत घ्यावी लागणार आहे. मात्र भाजपला सत्तेपासून लांब ठेवण्याची तयारी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेससह काँग्रेसने केली आहे. यासाठी गुप्त बैठकांवर जोर लावता जात आहे. याची कुणकुण लागताच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगली जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक मुंबईत घेत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र या बैठकीला एकही पदाधिकारी उपस्थित राहिला नाही यामुळे काठावरच बहुमत असून जिल्हा परिषदेवर महायुतीचा झेंडा फडण्यात आता शंका येत आहे.

Chandrakant Patil And Vishal Patil
kolhapur politics : ZP-महापालिकेमुळे महायुतीत वादाची ठिणगी: मुश्रीफांचा भाजपवर निशाणा; गोकुळवर भाष्य अन् सतेज पाटलांचे नाव घेत सूचक वक्तव्य

दरम्यान सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. 18 मार्च रोजी अध्यक्ष निवड प्रकिया होणार असून निवडीची तारीख जवळ आली असली तरी अद्याप भाजपच्या हाताला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना सापडलेली नाही. यामुळे जिल्हा परिषदेमध्ये भाजपला नशीब आणि चमत्कारच वाचवू शकणार अशी परिस्थिती आहे.

अशातच आता काँग्रेस खासदार विशाल पाटील यांनी भाजपचा चिमटा काढत मोठा सल्ला दिला आहे. पाटील यांनी, सांगली महापालिकेप्रमाणे जिल्हा परिषदेमध्ये परिस्थिती होणार नाही, असे म्हटले आहे. यामुळे काँग्रेसने सत्ता स्थापनेचा दावा अद्याप सोडलेला नसल्याचे बोलले जात आहे. तर विशाल पाटील यांनी, भाजपचे अस्तित्व केवळ मिरज आणि जत या दोन तालुक्यांपुरतेच मर्यादित असून जर आम्ही एकसंघपणे लढलो असतो, तर भाजप एका आकड्याच्या पुढे गेली नसती, असा दावाही यांनी केला आहे.

तसेच एवढा पराभूत झालेला पक्ष पुन्हा सत्तेत येण्यास इतका का इच्छुक आहे, हे कळत नाही, असेही म्हणत त्यांनी भाजपच्या सत्तालोलुपतेवर थेट बोट ठेवत टीका केली आहे. तसेच त्यांनी लोकांनी तुम्हाला जिल्हा परिषदेत नाकारलं असून उद्या ते विधानसभेतही नाकारतील आणि लोकसभेतही. त्यामुळे पराभवाची सवय लावून घ्या, जनतेने तुम्हाला दिलेला पराभव स्वीकारा, असे आवाहन पाटील यांनी केले.

दरम्यान भाजप नेते तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील पाटील यांनी यावर थेट भाष्य न करता, मी पुन्हा पुन्हा हेच सांगेन की, सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा भाजपचाच होणार. यामुळे आता अनेकांच्या भूवया उंचावल्या आहे. तर काही दिवसांपूर्वी वेट अँड वॉच ची भूमिका असणाऱ्या चंद्रकांत पाटलांकडून आता जिल्हा परिषद अध्यक्ष भाजपाचा होईल, असे सांगण्यात आल्याने सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आल्याचे संकेत असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाला आपण कोणत्याही प्रकारच्या व्हिपबाबत धमकी दिली नाही, मी फक्त कायदा समजून सांगितला. कायदा समजून सांगणं हे देखील आवडणार नसेल, तर तेही बंद करू, असा टोला त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला लगावला आहे.

पक्षीय बलाबल

जिल्हा परिषदेच्या निकालात सर्वाधिक 18 जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे असून येथे काँग्रेसच्या 11 जागा निवडून आल्या आहेत. यामुळे सत्ता स्थापनेसाठी महाविकास आघाडीला केवळ एका मताची गरज आहे. तर महायुतीतील भाजप 16, शिवसेना 7, राष्ट्रवादी काँग्रेसला 6, जनसुराज्य आणि रयत क्रांती पक्षाची प्रत्येकी 1 जागा निवडून आली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचीही 1 जागा निवडून आली आहे. येथे सत्ता स्थापनेसाठी 30 सदस्यांची गरज असून महायुतीकडे 31 चे संख्याबळ आहे. पण दोन्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आल्यास येथे भाजप विरोधात बसावे लागणार आहे.

Chandrakant Patil And Vishal Patil
kokan politics : रत्नागिरी ZP अध्यक्ष निवडणुकीपूर्वी भास्कर जाधवांच्या मुलाकडे महत्वाची जबाबदारी; भाजपची जंबो कार्यकारिणी जाहीर

FAQs :

1. सांगली जिल्हा परिषद अध्यक्षपदाबाबत काय विधान करण्यात आले?
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष भाजपाचाच होईल, असा दावा केला.

2. विरोधकांनी भाजपवर काय आरोप केले?
विरोधकांनी भाजपवर सत्तालोलुपतेचा आरोप करत जनतेने जिल्हा परिषदेत भाजपला नाकारल्याचे म्हटले.

3. यापूर्वी चंद्रकांत पाटील यांची भूमिका काय होती?
काही दिवसांपूर्वी त्यांनी ‘वेट अँड वॉच’ ची भूमिका असल्याचे सांगितले होते.

4. सांगली जिल्ह्यात भाजपचे अस्तित्व कुठे आहे असे म्हटले गेले?
भाजपचे अस्तित्व मिरज आणि जत या दोन तालुक्यांपुरते मर्यादित असल्याचा दावा करण्यात आला.

5. या प्रकरणामुळे काय घडले?
जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून सांगली जिल्ह्यातील राजकारण तापले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com