Solapur Politic's : ‘पुणे शिक्षक-पदवीधर’मध्ये मोठी राजकीय घडामोड : पवारांच्या आमदाराची भाजपच्या मेळाव्याला हजेरी; चर्चांना उधाण

Pune Teachers-Graduates Constituency Election 2026 : पुणे शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीच्या प्रचारादरम्यान करमाळ्याचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार नारायण पाटील भाजपच्या मेळाव्याला उपस्थित राहिले. महाविकास आघाडीतील आमदार महायुतीच्या व्यासपीठावर दिसल्याने सोलापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे.
Narayan Patil
Narayan PatilSarkarnama
Published on: 
Updated on: 

Solapur, 18 October : पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक प्रचारात सोलापूर जिल्ह्यात मोठी घडामोड घडली आहे. करमाळ्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार नारायण पाटील यांनी भाजपच्या मेळाव्याला हजेरी लावली आहे. महाविकास आघाडीतील आमदार महायुतीच्या व्यासपीठावर आल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान, करमाळ्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार नारायण पाटील यांचाच नव्हे तर माळशिरसचे आमदार उत्तम जानकर आणि सांगोल्याचे शेकापचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांचाही भाजप महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा आहे, असा दावा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केला आहे.

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील भाजपचे उमेदवार अनुक्रमे डॉ. स्मिता जाधव आणि कौस्तुभ गावडे यांच्या प्रचारार्थ बार्शी येथे भाजप-महायुतीचा मेळावा झाला. त्या मेळाव्याला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार राजेंद्र राऊत यांची उपस्थिती होती. या मेळाव्याला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांनी हजेरी लावली. त्यांना पहिल्या रांगेत स्थान मिळाले होते.

करमाळ्याचे आमदार नारायण पाटील हे विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपासूनच महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षापासून भाजपच्या थेट व्यासपीठावर दिसून येत आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीत खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी जिल्हाध्यक्ष वसंत देशमुख यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. पण नारायण पाटील यांनी त्यावेळी भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत यांना पाठिंबा दिला होता.

Narayan Patil
Satara Dcc Bank Election : 10 वर्षांच्या नियमांचा दिग्गजांना दणका : सातारा जिल्हा बॅंकेसाठी अशा रंगणार लढती...

पुणे पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीत आमदार नारायण पाटील हे महाविकास आघाडीपासून दूर होते. त्यांनी मंत्री चंद्रकांतदादांच्या उपस्थितीत झालेल्या भाजपच्या मेळाव्याला नारायण पाटील यांनी हजेरी लावली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला सोलापूर जिल्ह्यात मोठा धक्का मानला जात आहे.

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील भाजप-महायुतीच्या बार्शीतील मेळाव्याला आमदार नारायण पाटील यांनी उपस्थिती लावल्यानंतर सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मोठा दावा केला आहे, त्यामुळे महाविकास आघाडीची अडचण झाली आहे.

केवळ आमदार नारायण पाटीलच नव्हे, तर माळशिरसचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार उत्तम जानकर आणि सांगोल्याचे शेकापचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांचाही भाजप महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा आहे, असा दावा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केला आहे.

Narayan Patil
Tukaram Mundhe : तुकाराम मुंडेंचा कऱ्हाडमधून कडक इशारा : ‘मी येणार म्हणून हॉटेल बंद ठेवले असतील तर...’

महाविकास आघाडीचे पुणे पदवीधर मतदारसंघात दोन उमेदवार उभे आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सुनील मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या हर्षदा देशमुख हे दोघे रिंगणात आहेत. इथेच मोठा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे आमदार नारायण पाटील हे कन्फ्यूज झाले असतील आणि इकडे आले असतील, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com