Satara: पालिकेची निवडणूक आल्यानेच उदयनराजेंची दिल्लीत नौटंकी.. शिवेंद्रसिंहराजे

सातारा पालिकेला Satara Palika अक्षरशा लुटून खाणारे आता निवडणूक Election आली की, निवेदन आणि फोटोसेशन Photo sesssion करून विकासाची खोटी स्वप्ने False dreams of development रंगवत आहेत.
Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale
Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosalesarkarnama

सातारा : कास धरण उंची वाढवण्यासाठी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यामुळे वाढीव निधी मिळाला. आता या प्रकल्पाचे काम ९० टक्के पूर्ण झाले असताना वाढीव पाईपलाईनचा पत्ताच नाही. त्यामुळे सातारकरांना कासचे वाढीव पाणी फक्त पहावेच लागणार आहे. याला पालिकेचा नियोजनशून्य आणि भ्रष्ट कारभार जबाबदार आहे. पालिकेची निवडणूक जवळ आल्याने उदयनराजेंची दिल्लीत निवेदने देऊन फोटोसेशन करण्याची नौटंकी सुरु झाली आहे, अशी टीका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली.

शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, विकासाची खोटी स्वप्ने दाखवण्याचे दिवस आता संपले असून सातारकरांना जाब देण्याची वेळ आली आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी दिल्लीत गृहनिर्माण व नगर मंत्रालयात हरदीपसिंग पुरी यांची भेट घेऊन कास बंदिस्त पाईपलाईनची सुधारणा व त्याच्याशी निगडीत कामांना निधी मिळण्यासाठी निवेदन दिले. उदयनराजेंच्या या दिल्ली निवेदनावर शिवेंद्रसिंहराजे यांनी जोरदार टीका केली आहे.

Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale
शिंदेंच्या बंडात काहीही नाही; ही तर दोन वर्षांपासूनची खदखद... उदयनराजे

गेले पाच- सहा वर्ष पालिकेत मनमानी, नियोजनशून्य आणि भ्रष्ट कारभाराने कळस गाठला आहे. टेंडर, टक्केवारी, कमिशन यासाठी एकमेकांचे गळे धरून, मारामाऱ्या करून पालिकेला भ्रष्टाचाराचे कुरण बनविले. पालिकेचा आणि सातारकरांचा पैसा लुटण्याचा एक कलमी कार्यक्रम पालिकेत सुरु होता. आता निवडणूक आली की, मंजूर नसलेल्या, न होणाऱ्या आणि दुसऱ्याने केलेल्या कामांचे नारळ फोडायचे, मुंबई, दिल्लीवारी करून मंत्र्यांच्या भेटी घेवून निवेदन द्यायचे आणि फोटोसेशन करून सातारकरांना भुलवायचे हे प्रकार जोमाने सुरु झाले आहेत.

Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale
लवकरच फडणवीसांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत येणार... शिवेंद्रसिंहराजे

वास्तविक कास धरण उंची वाढवण्याचे काम सुरु झाल्यानंतर पालिकेने वाढीव पाईपलाईन टाकण्याबाबतचे नियोजन करणे आवश्यक होते. मात्र सातारकरांशी काहीही देणेघेणे नसणाऱ्या सत्ताधाऱ्यांना फक्त पैसा आणि पैसा याशिवाय दुसरे काहीच दिसत नव्हते. सत्तारूढ आघाडीत नगरसेवकांच्या टेंडर, कमिशन आणि टक्केवारीसाठी लागणाऱ्या कळवंडी सातारकरांना उघड्या डोळ्याने पाहायला लागल्या. डीडीटी पावडरच नव्हे तर कचऱ्यातही पैसे खाण्याची जणू स्पर्धाच होती. भ्रष्टाचारमुक्त कारभार असा डांगोरा पिटून आणि सर्वसामान्य महिला नगराध्यक्ष असा दिखावा करून सातारकरांना भावनिक करून पालिकेची सत्ता मिळवली. पालिकेचा अक्षरशा बाजार करून टाकला.

Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale
शिवेंद्रसिंहराजेंच्या पाठपुराव्याला यश; कास धरणासाठी २५ कोटींचा पहिला हप्ता पालिकेकडे जमा 

कुठे आहे सर्वसामान्य महिला नगराध्यक्ष? असा सवाल सातारकर वारंवार करीत आहेत. राज्य सरकारने हद्दवाढीत समाविष्ट झालेल्या भागासाठी रस्ते आणि मुलभूत सुविधा पुरवण्यासाठी ४० कोटी रुपये मंजूर केले आहेत पण, त्यातही पैसे खायला मिळावेत म्हणून आपल्याच मर्जीतल्या ठेकेदाराला हे काम मिळावे म्हणून या कामाची टेंडरप्रक्रिया रखडवून शहराच्या विकासाला खीळ बसवण्याचे काम सुरु आहे.

Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale
शिवेंद्रसिंहराजे म्हणतात, उदयनराजेंना माझं बोलणं झोंबलं....

सातारा पालिकेला अक्षरशा लुटून खाणारे आता निवडणूक आली की, निवेदन आणि फोटोसेशन करून विकासाची खोटी स्वप्ने रंगवत आहेत. वास्तविक ज्यावेळी निधी अभावी कास प्रकल्पाचे काम थांबले होते त्यावेळीच वाढीव पापीपलाईनसाठीचा प्रस्ताव शासनाकडे सादर व्हायला हवा होता. पण, त्यावेळी यांना कशाचेच काहीही देणेघेणे नव्हते, हे आणि प्रशासन झोपा काढत होते.

Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale
वैरत्व विसरून उदयनराजे, बाळासाहेब पाटील यांची बंद खोलीत चर्चा...

ज्यात पैसे आहेत त्यातच यांना इंटरेस्ट असतो, हे सातारकरांना केव्हाच कळून चुकले आहे. पाईपलाईनचे काम मंजूर व्हायला वर्ष लागणार, त्यानंतर काम सुरु होणार आणि पूर्ण कधी होणार? तोपर्यंत सातारकरांना कासचे फक्त बघतच बसावे लागणार आहे. धरणाची उंची वाढली, पाणीसाठाही वाढला पण सातारकरांना वाढीव पाणी मात्र मिळणार नाही. हे पाप तुम्ही केले. आता तुमच्या पापाचा घडा भरला असून सुज्ञ सातारकर तुम्हाला चांगला धडा शिकवतील, असेही त्यांनी शेवटी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com