
Mumbai, 12 May : माझी पत्नी एका सहकारी बॅंकेची अध्यक्ष आहे. मी उधळपट्टी करणाऱ्या राजकीय कार्यकर्त्यांचे मंजूर करायला सांगतो, असा त्यांचा समज असतो, त्यामुळे ते मला अधूनमधून ‘बॅंकचे कर्ज देण्याबाबत तुम्ही आम्हाला सांगू नका,’ असे सांगत असतात. त्यामुळे कर्जमंजुरीबाबत माझ्या पत्नीला मी कोणतीही सूचना करत नाही. पण, मी जेव्हा ‘ई रिक्षाला कर्ज द्या,’ असं सांगितलं. तेव्हा ‘आमचे पैसे डुबले तर तुम्ही जबाबदार आहात का,’ असा सवाल पत्नीने मला केला होता, अशी आठवण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला.
राज्य सहकारी बॅंकेच्या (State Cooperative Bank) वतीने सहकाराचे सक्षमीकरण आणि सरकारचे धोरण या विषयावर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमात गडकरी यांनी समाज उभा करण्यात सहकारी संस्थांचा वाटा किती मोठा यावर बोलताना ‘ई रिक्षा’ला कर्जपुरवठ्याबाबतचे उदाहारण दिले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ नेते शरद पवार, राज्य सहकारी बॅंकेचे विद्याधर अनास्कर व इतर नेतेमंडळी उपस्थित होते.
नितीन गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले, ई रिक्षा खरेदी करणाऱ्यांना कर्ज द्यावे, यासाठी राष्ट्रीयकृत बॅंकांची एक बैठक मी बोलावली होती. तुम्ही या रिक्षा खरेदी करणाऱ्यांना पतपुरवठा करावा, अशी सूचना केली होती. पण त्यांच्याकडून फारसा उत्साह मिळाला नाही. पण मी जेव्हा, सहकारी बॅंका, क्रेडीट को ऑपरेटिव्ह सोसायटी आदींच्या ठिकठिकाणी जाऊन बैठका घेतल्या आणि सांगितले की, ई रिक्षा खरेदी करणाऱ्यांना पतपुरवठा करावा. आश्चर्य वाटेल की या छोट्या छोट्या संस्थांनी ई रिक्षा चालवणाऱ्या लोकांना पतपुरवठा केला. आज ते ई रिक्षाचे मालक झाले आहेत.
माझी पत्नी एका सहकारी बॅंकेची अध्यक्ष आहे. मी जरी राजकारणात असलो तरी माझ्या परिवारातील कोणीही राजकारणात नाही. मी राजकारणात असल्याने काहीतरी उधळपट्टी करणाऱ्या कोणातरी कार्यकर्त्यांचं कर्ज मंजूर करायला सांगतो, असा त्यांचा समज असतो, त्यामुळे बॅंकेचे कर्ज देण्याबाबत तुम्ही आम्हाला सांगू नका, अशा सूचना ते मला अधूनमधून देत असतात. त्यामळे मी त्यांना कर्ज मंजूर करण्याबाबतची सूचना देतही नाही. जेव्हा ई रिक्षाला कर्ज द्या, असं सांगितलं तेव्हा माझ्या बायकोने, ‘आमचे पैसे डुबले तर तुम्ही जबाबदार राहणार का?, असा सवालही नितीन गडकरी यांनी केला.
ते म्हणाले, तेव्हा मी माझ्या पत्नीला एवढंच म्हटलं की, ‘तू पहिले पन्नास रिक्षांना देऊन तर बघ आणि आज तुम्हाला सांगतो त्यांनी आठशे रिक्षांना पतपुरवठा केला आहे. त्यातील एकही थकबाकीदार नाही. म्हणजे एका छोट्याशा बॅंकेने आठशे लोकांना कर्ज दिले आहे.
या सहकारी संस्थांमुळे किती मोठी सोय झाली आहे. या सहकारी संस्थांनी छोट्या छोट्या लोकांना अर्थपुरवठा केला नसता, तर राष्ट्रीयकृत बॅंकांमध्ये लोकांना जाता आले नसते. कारण फायनान्सचं क्षेत्र छोटं आहे. छोट्या छोट्या लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या सहकारी संस्थांनी मोठी भूमिका निभावली आहे, असेही गडकरी यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.