Satara ZP : शिवसेना आमदाराचा गौप्यस्फोट : ‘कामेश कांबळेंनी मतदान केलं नसतं; तर भाजपचा बी प्लॅन तयार होता, राष्ट्रवादीचे 5 सदस्य...’

Mahesh Shinde Statement : महेश शिंदे यांनी साताऱ्यातील झेडपी निवडणुकीत भाजपकडे राष्ट्रवादीचे पाच सदस्य तयार असल्याचा दावा केला. क्रॉस वोटिंग आणि रणनीतीमुळे निवडणूक अधिकच चर्चेत आली.
Mahesh Shinde
Mahesh Shinde Sarkarnama
Published on
Updated on

Satara, 21 March : सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत रंगलेल्या ‘हायव्होल्टेज ड्रामा’मध्येच भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादीचे सदस्य फोडून अध्यक्षपदावर मोहोर उमटवली. अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत कामेश कांबळे यांचे मतदान गाजले. त्याबाबत भाजपसोबत गेलेले शिवसेना आमदार महेश शिंदे यांनी गौप्यस्फोट करताना ‘कामेशने आमच्या बाजूने हात वर केला नसता, तर आमच्याकडे बी प्लॅन तयार होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच सदस्य आमच्या बाजूने मतदान करायला तयार होते,’ असा दावा शिवसेना आमदार शिंदे यांनी केला आहे.

सातारा जिल्हा परिषदेच्या (Satara Zilla Parishad) अध्यक्षपदी प्रिया महेश शिंदे यांची, तर उपाध्यक्षपदी राम भोसले यांची निवड झाली आहे. त्यासंदर्भात आमदार महेश शिंदे म्हणाले, एवढे मोठे नेते असतानाही तुम्ही दीड दीड महिने सदस्यांना कोंडून ठेवलं. तरीही सदस्य तुमच्यासोबत टिकले नाहीत. सदस्यांना या गोष्टी मान्यच नव्हत्या. सर्वांत मोठा पक्ष भाजप होता, त्यामुळे त्यांच्यासेाबत जाणं अपेक्षित होतं.

राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच सदस्य आमच्यासोबत यायला तयार होते. आम्हाला नरेंद्र मोदी, अमित शाह यांचं कसरकार आवडतं. त्यांच्याशिवाय आमच्याकडं कामं होणार नाहीत, असा विश्वास त्यांचा होता. ते सदस्य स्वतः आम्हालासुद्धा भेटले होते, असेही शिंदे यांनी सांगितले.

आमदार शिंदे म्हणाले, कामेश कांबळे यांनी खूप चांगलं काम केलं. कामेशसारखे अजून पाच जण भाजपच्या बाजूने हात वर करायला तयार होते. कामेशला कोणीही जबरदस्ती केलेली नाही. जिल्हाधिकारी आणि इतर अधिकारी यांनी नियमांचे काटेकोर पालन केले आहे. उलट राष्ट्रवादीचे नेते कामेश कांबळे यांना दमबाजी करत होते, हे सीसीटीव्हीत दिसून येईल. आमच्याकडून कोणीही कांबळे यांना बोलले नाही.

Mahesh Shinde
Satara ZP : शंभूराज देसाईंचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करणाऱ्या भाजपच्या खेळीत शिवसेना आमदारही सहभागी; एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष!

कामेश कांबळे हा शिवेंद्रसिंहराजे भोसलेंचा निकटचा कार्यकर्ता आहे. त्यांनी त्याला आवाहन केलं असेल पण त्यादिवशी त्यांनी कामेश कांबळेशी चर्चाही केलेली नाही, हे त्या दिवशीचे सीसीटीव्ही तपासून पाहू शकता. फक्त अगोदर शिवेंद्रराजेंनी कामेश कांबळेंना सांगितलं होतं की, कामेश मी तुझी खूप कामं केलेली आहेत, तू माझा कार्यकर्ता आहेस, त्यामुळे तू आम्हाला मदत कर आणि हे राजकारणात चालतं. त्यांनी ते केलं आणि कामेशला शिवेंद्रराजेंनी केलेली मदत आणि त्या मदतीच्या जीवावरच त्यांनी भाजपला मतदान केलं आहे, असा दावा महेश शिंदे यांनी केला.

Mahesh Shinde
ZP President : सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष अन्‌ सभापतींना मिळणार नवी कोरी वाहने

‘तो हस्तक्षेप राष्ट्रवादीच्या सदस्यांना आवडलेला नव्हता’

ते म्हणाले, शशिकांत शिंदे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना त्यांच्या सदस्यांवरच विश्वास राहिला नव्हता. आमच्याकडे ३३ सदस्य होते. आम्ही ते ३८ ही करू शकत होतो. कामेशची इच्छा झाली नसती तर अल्टरनेट आमच्याकडे राष्ट्रवादीचे पाच सदस्य होते. कामेशने जर मदत केली नाही, तर आमच्यातील कोणीही एक जण हात वर करेल. कारण आम्हाला भाजप सरकारचं कामं आवडतं, असं त्यांनी आम्हाला सांगितलं होतं. महाविकास आघाडीचे नेते त्याठिकाणी आलेले कोणालाही आवडलेलं नव्हतं. मागील आठवड्यात त्यांचा झालेला हस्तक्षेप आवडलेला नव्हता, त्यामुळे राष्ट्रवादीच्या पाच सदस्यांनी आम्हाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com