ZP President : सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष अन्‌ सभापतींना मिळणार नवी कोरी वाहने

Solapur ZP President Vehicle : सोलापूर झेडपी अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापतींसाठी नवीन गाड्या घेण्याचा निर्णय झाला. जुन्या गाड्या बदलून १५ लाखांपर्यंतच्या वाहनांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.
ZP President Vehicle
ZP President VehicleSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 21 March (विठ्ठल सुतार) : नवनिर्वाचित जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षांसह विषय समिती सभापती आणि पंचायत समिती सभापतींसाठी लवकरच नवी वाहने घेण्यात येणार आहेत. झेडपी अध्यक्ष आणि उपाध्यक्षांसाठी १५ लाखांपर्यंत, तर सभापतींसाठी १२ लाखांपर्यंतची वाहने घेता येणार आहेत, आधीची वाहने जुनी झाली आहेत, त्यामुळे नव्या गाड्या घेण्यात येणार आहेत, त्यासाठी पुरेशा निधीची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली.

अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीनंतर आता २७ मार्च रोजी विषय समिती सभापती पदांसाठीच्या निवडी होणार आहेत, त्यामुळे अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड झाली आहे. आता नवे विषय सभापती निवडल्यानंतर जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) नियमित कामकाजाला येत्या १ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे.

त्यापूर्वी सोलापूर (Solapur ) जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्षांसह पंचायत समितींच्या सभापतींपदासाठी नवीन वाहने देण्यात येणार आहेत. आधीची वाहने जुनी झाल्याने आणि मर्यादेपेक्षा अधिक काळ वापरल्याने १२ नवीन वाहने ताफ्यात समाविष्ट करण्यात येणार आहेत.

सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्यासाठी १५ लाख रुपयांपर्यंतच्या किमतीची वाहने घेण्यात येणार आहेत, तर उर्वरित १० वाहने ही १२ लाख रुपये किमतीच्या मर्यादेतील असतील.

ZP President Vehicle
Jaykumar Gore : फडणवीसांनी सोपवलेली अर्धी लढाई गोरेंनी जिंकली; मोहिते पाटील, रामराजेंचं केडर उद्ध्वस्त, शंभूराज, मकरंदआबांनाही धूळ चारली

नवीन वाहने खरेदी करण्यापूर्वी दोन ते तीन कंपन्यांकडून कोटेशन मागवण्यात येणार आहेत. त्यानंतर पदाधिकाऱ्यांनी पसंत केलेल्या कंपनीचे वाहन निश्चित करण्यात येणार आहे. याबाबतची प्रक्रिया पुढील आठवड्यात सुरू करण्यात येणार आहे, असे सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम यांनी सांगितले.

ZP President Vehicle
Parth Pawar birthday : “प्रिय पार्थ…” दादांच्या अनुपस्थितीत वाढदिवस; तटकरेंनी उलगडला वारशाचा मुद्दा, दिल्लीसह पक्ष संघटनेत जबाबदारीचे संकेत?

सोलापूर जिल्ह्यातील ११ पैकी पाच पंचायत समितीच्या सभापतींची वाहने चांगल्या स्थितीत आहेत. उर्वरीत ६ सभापतींकडील वाहने जुनी आहेत, त्यामुळे ६ पंचायत समिती सभापतींसाठीही नवीन वाहने खरेदी करण्यात येणार आहेत. एका वाहनाच्या किमतीची मर्यादा १२ लाख रुपयांपर्यंतची आहे. लवकरच सर्व सभापतींना वाहने उपलब्ध करण्यात येणार असल्याचे सीईओ जंगम यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com