Solapur Crime : सोलापुरात पुन्हा विशाल फटे प्रकरण; माजी नगरसेवक पुत्रासह 124 जणांना घातला 15 कोटी 40 लाखांचा गंडा

Share Market Fraud : बार्शीतील विशाल फटे याने तब्बल 129 पेक्षा जास्त लोकांना 25 कोटींपेक्षा जास्त रकमेचा चुना लावला होता. सोलापुरातील या प्रकरणामुळे बार्शीतील विशाल फटे प्रकरणाची आठवण ताजी झाली आहे.
Share Market Fraud
Share Market FraudSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 21 February : सोलापुरात बार्शीतील विशाल फटे प्रकरणाची पुनरावृत्ती झाली आहे. शेअर बाजारात पैसे गुंतवणूक करून, त्याद्वारे जादा परताव्याचे अमिष दाखवून सोलापुरात माजी नगरसेवकाच्या मुलासह तब्बल १२४ जणांना १५ कोटी ४० लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे सोलापुरात खळबळ उडाली आहे.

बार्शीतील विशाल फटे (Vishal Phate) याने तब्बल १२९ पेक्षा जास्त लोकांना २५ कोटींपेक्षा जास्त रकमेचा चुना लावला होता. सोलापुरातील या प्रकरणामुळे बार्शीतील विशाल फटे प्रकरणाची आठवण ताजी झाली आहे. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे दिला होता.

बार्शीतील विशाल फटे याने तब्बल १२९ पेक्षा जास्त लोकांना २५ कोटींपेक्षा जास्त रकमेचा चुना लावला होता. सोलापुरातील (Solapur) या प्रकरणामुळे बार्शीतील विशाल फटे प्रकरणाची आठवण ताजी झाली आहे. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे दिला होता.

Share Market Fraud
Eknath Shinde Nagpur Tour : फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंची डायलॉगबाजी; 'शिंदे जहाँ खडा होता है, वहिसे लाईन शुरू होती है...!'

आशिष अशोक पाटील (वय २५, रा. न्यू संतोष नगर, सोलापूर) यांच्या फिर्यादीवरून विजापूर नाका पोलिस ठाण्यात निवृत्ती पैलवान व त्याची पत्नी सुरेखा पैलवान या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. निवृत्ती पैलवान याने माजी नगरसेवक पुत्र आशिष पाटील यांना पाच टक्के दराने परतावा मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले होते. पैलवान याने त्यांच्याकडून वेळोवेळी ८० लाख रुपये घेतले होते. मात्र, ठरल्याप्रमाणे परतावा दिला नाही.

आपली फसवणूक झाल्याचे आशिष अशोक पाटील यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी विजापूर नाका पोलिस ठाण्यात निवृत्ती पैलवान व त्याची पत्नी सुरेखा पैलवान यांच्याविरुद्ध फसवणुकीची तक्रार दिली होती. त्या तक्रारीनुसार पैलवान पती-पत्नीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला होता. मात्र, या गुन्ह्याची व्याप्ती वाढू लागल्याने हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे.

निवृत्ती पैलवान याने एकूण 124 ठेवीदारांकडून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे आणि जादा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून तब्बल 15 कोटी 40 लाख रुपयाची फसवणूक केल्याची बाब तपासात उघड झाली आहे.

Share Market Fraud
Eknath Shinde : मी अडीच वर्षांपूर्वीच जोरदार धक्का देऊन ‘त्यांचा’ टांगा पलटी केलाय; एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना जोरदार टोला!

गुन्हा दाखल झाल्यानंतर पैलवान हा बेपत्ता होता. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात त्याच्या पत्नीनेही तो बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली होती. तो गुरुवारी (ता. २०) पोलिसांना शरण आला. त्यानंतर शुक्रवारी (ता. २१ फेब्रुवारी) त्याला विशेष सत्र न्यायाधीश जे. जे. मोहिते यांनी तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com