Eknath Shinde Nagpur Tour : फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंची डायलॉगबाजी; 'शिंदे जहाँ खडा होता है, वहिसे लाईन शुरू होती है...!'

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विदर्भात जोरदार बॅटिंग केली. उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर जोरदार टोलेबाजी केली. यावेळी त्यांनी खरी शिवसेना कोणाची याचेही उत्तर देऊन टाकले आहे.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Nagpur, 21 February : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विदर्भात जोरदार बॅटिंग केली. उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर जोरदार टोलेबाजी केली. यावेळी त्यांनी खरी शिवसेना कोणाची याचेही उत्तर देऊन टाकले आहे. आम्ही विधानसभेच्या ८० जागा लढवून ६० जिंकल्या आहेत, तर उबाठाने ९० जागा लढवल्या आणि फक्त २० आमदार निवडून आले, त्यामुळे शिवसेना कोणाची याचे उत्तर जनतेनीच दिले. ‘शिंदे जहाँ खडा होता है, वहिसे लाईन शुरू होती है’ असा डॉयलॉगही त्यांनी या वेळी मारला.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत आज विविध पक्षांच्या शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. नागपूरमध्ये झालेल्या पक्ष प्रवेश समारंभात नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा जिल्ह्यातील मनसे, उद्धव ठाकरे सेना, काँग्रेस आणि शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा त्यामध्ये समावेश आहे. ‘तुम्ही माझ्यावर विश्वास टाकून पक्षप्रवेश केला आहे, तुमच्या विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नाही,’ असे आश्वासन शिंदे यांनी दिले.

शिंदे म्हणाले, मुख्यमंत्री असता महायुतीने सुरू केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुपरहीट ठरली. आत इतर राज्यातही ही योजना राबवली जात आहे. याशिवाय शासन आपल्या दारी योजनेची अजूनही विविध राज्यांमधून विचारणा केली जात आहे. मुख्यमंत्री सहायता निधीवर सुमारे २६० कोटी रुपये आम्ही खर्च केले. लोकांना त्रास होऊ दिला नाही. प्रत्येकाची कामे लोकांच्या दारात जाऊन करून दिली आहे.

Eknath Shinde
Eknath Shinde : मी अडीच वर्षांपूर्वीच जोरदार धक्का देऊन ‘त्यांचा’ टांगा पलटी केलाय; एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना जोरदार टोला!

बाळासाहेब ठाकरे म्हणायचे, शिवसैनिक घरात नाही तर लोकांच्या दारात शोभतो. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांची अंमलबजावणी केली. महाविकास आघाडीच्या काळात मुख्यमंत्रीच घराच्या बाहेर पडत नव्हते. त्यांनी मुख्यमंत्री सहायता योजनेवर अडीच कोटी रुपयेसुद्धा खर्च केले नव्हते, असाही टोला शिंदे यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना लगावला.

Eknath Shinde
Marathi Sahitya Sammelan : पंतप्रधान मोदींकडून पवारांना पुन्हा तोच आदर आणि तोच मानसन्मान; साहित्य संमेलनातील ‘त्या’ कृतीची जोरदार चर्चा!

मुख्यमंत्री केले नसल्याने मी नाराज आहे, मला रोज धक्के दिले जात आहे, माझी उपयोगिता संपली या संजय राऊत आणि विरोधकांच्या आरोपांचाही एकनाथ शिंदे यांनी समाचार घेतला. मी खुर्ची शोधत नाही, तर माणसे शोधते. पद वरखाली होत असते. त्याने काही बिघडत नाही. मी काम करणारा कार्यकर्ता आहे. शिंदे जहाँ खडा होता है, वहिसे लाईन शुरू होती है, असा डॉयलॉगही मारून त्यांनी संजय राऊत आणि कंपनीचा समाचार घेतला.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com