पंढरपूरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात घुमणार भजन,कीर्तनचा आवाज; वारकऱ्यांचा लढा यशस्वी

Pandharpur : मंत्री शंभूराज देसाई यांनीही मंदिर समितीच्या अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या होत्या.
Shri Vitthal-Rukmini Temple, Pandharpur Latest News
Shri Vitthal-Rukmini Temple, Pandharpur Latest NewsSarkarnama

पंढरपूर : श्री क्षेत्र पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये वारकऱ्यांना भजन कीर्तन करण्यास परवानगी नाकारण्या आली होती. त्यावर वारकऱ्यांनी मंदिर समितीच्या या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करत आंदोलनाचा इशारा दिला होता.

यावर आता मंदिर समितीला नमते घ्यावे लागले असून मंदिरातील सभा मंडपामध्ये वारकऱ्यांना भजन कीर्तन करण्यास परवानगी मिळाली आहे. या संदर्भातील माहिती ही मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी दिली आहे. (Shri Vitthal-Rukmini Temple, Pandharpur Latest News)

Shri Vitthal-Rukmini Temple, Pandharpur Latest News
'वेदांता फॉक्सकाँन'चे सत्य चौकशीतून समोर आणू...

आळंदी येथील विनोद जाधव महाराज यांना मंदिरातील विठ्ठल सभा मंडपामध्ये नामजप करण्यास मंदिर समितीच्या अधिकाऱ्यांनी परवानगी नाकारली होती. त्यानंतर वारकरी आणि मंदिर समितीच्या अधिकाऱ्यांमधील वाद निर्माण झाला होता. त्यानंतर माध्यमांनी आवाज उठवल्यानंतर आज मंदिर समितीने आपल्या निर्णयाचा फेर विचार करत मंदिरातील सभा मंडपामध्ये वारकऱ्यांना नाम जप भजन कीर्तन करण्यास परवानगी दिली आहे.

Shri Vitthal-Rukmini Temple, Pandharpur Latest News
कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण कराल तर कारवाई : सत्तारांचा शिवसेनेला इशारा

दरम्यान, या संदर्भात काल शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनीही मंदिर समितीच्या अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या होत्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com