Leader of Opposition : विरोधी पक्षनेता कोणाला करायचं? ते आधी ठरवा; शिंदेंच्या शिलेदाराचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

Ashish Jaiswal's counterattack On Uddhav Thackeray : हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी विरोधी पक्षनेता नियुक्तीवर सरकारला घेरले आहे. आशिष जयस्वाल यांनी उद्धव सेनेत एकमतच नाही असा आरोप करून विरोधकांच्या भूमिकेवर पलटवार केला.
Uddhav Thackeray-Ashish Jaiswal
Uddhav Thackeray-Ashish JaiswalSarkarnama
Published on
Updated on
  1. हिवाळी अधिवेशनापूर्वीच विरोधकांनी विरोधी पक्षनेतेपदाची नियुक्ती न करण्याबद्दल सरकारवर आरोप करून राजकीय तणाव वाढवला आहे.

  2. आशिष जयस्वाल यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत विरोधी पक्षनेतेपदासाठी शिवसेनेतच एकमत नाही, भास्कर जाधव, आदित्य ठाकरे आणि सुरेश प्रभू ही तीन नावे चर्चेत असल्याचे सांगितले.

  3. विरोधक 10% सदस्यसंख्येचा नियम नसल्याचा दावा करत असल्याने वाद चिघळला आहे, तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी नियुक्ती सरकार नव्हे तर सभापती करतात, असे स्पष्ट केले.

Nagpur, 08 December : हिवाळी अधिवेशनाची लगबग सुरू झाल्यापासून विरोधकांनी विरोधी पक्षनेत्याचा नियुक्तीचा मुद्दा ताणून धरला आहे. महायुती सरकाराला विरोधी पक्षनेता निवडायचा नाही. दहा टक्के सदस्यांचा आकडा हवा, असा नियमांचा दाखला पुढे करून सरकार दिशाभूल करीत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.

विरोधकांच्या आरोपावर बोलताना राज्याचे अर्थराज्यमंत्री तसेच शिवसेनेचे नेते आशिष जयस्वाल (Ashish Jaiswal) यांनी आधी विरोधी पक्षनेता कोणाला करायचे? हे ठरवा, असा टोला उद्धव ठाकरे यांना लगावला. कोणाच्या एकाच्या नावावर उद्धव सेनेत एकमत होऊच शकत नाही, असाही दावा त्यांनी केला.

महायुतीचे सरकार स्थापन झाल्यापासून ज्येष्ठत्व आणि आक्रमकतेच्या निकषावर माजी मंत्री भास्कर जाधव यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने अद्याप कोणाचेच नाव विधानसभा अध्यक्षांकडे दिले नाही. मध्यंतरी याच कारणावरून भास्कर जाधव नाराज होते. आता आदित्य ठाकरे यांचे नाव पुढे आले आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे आदित्य यांच्यासाठी आग्रही असल्याचे बोलले जाते, असेही मंत्री जयस्वाल यांनी सांगितले.

दुसरीकडे, सुनील प्रभू यांचे नाव विरोधी पक्षनेतेपदासाठी चर्चेत आले. या तीन नावांपैकी उद्धव ठाकरे यांनी एक नाव निश्चित करावे आणि अध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून विधानसभा अध्यक्षांकडे प्रस्ताव द्यावा, अशी सूचनाही जयस्वाल यांनी केली. या वेळी त्यांनी भास्कर जाधव यांच्यासारख्या अनुभवी व ज्येष्ठ नेत्याला डावलल्या जात असल्याचे दिसून येत आहे, अशी शंका व्यक्त केली.

Uddhav Thackeray-Ashish Jaiswal
Barshi Bazar Samiti Result : नगरपरिषद निकालाआधीच राजेंद्र राऊतांनी गुलाल उधळला; बार्शी बाजार समितीच्या सर्व 18 जागा जिंकून सोपल गटाचा उडवला धुव्वा...

तत्पूर्वी भास्कर जाधव यांनी महायुती सरकारला विरोधी पक्षनेता नियुक्तच करायचा नसल्याचा आरोप केला आहे. आमची संख्या कमी आहे मात्र, त्यांची पापे जास्त आहेत. ती बाहेर पडू नये, याची काळजी सत्ताधारी घेत आहेत. विरोधी पक्षनेतेपदासाठी १० टक्के सदस्यसंख्या, असा कुठलाच नियमन नाही. घटनेतही त्याचा उल्लेख नाही. आम्ही असा काही नियम असल्याचे लेखी माहिती द्यावी अशी मागणी विधानसभा सचिवांकडे केली होती. त्यांनीसुद्धा असा कुठला नियम नसल्याचे लेखी पत्र दिले आहे.

यापूर्वी सहा आणि दहा आमदार असतानाही विरोधकांनी विरोधी पक्षनेतेपद दिले होते. तेव्हा काँग्रेसची सत्ता होती. हे बघता भाजपपेक्षा काँग्रेस पक्ष जास्त चांगला होता, असेही भास्कर जाधव म्हणाले.

Uddhav Thackeray-Ashish Jaiswal
Gopichand Padalkar : विरोधी पक्षनेतेपद कधी नेमणार?; फडणवीसांच्या निकटवर्तीय आमदाराने वर्षंच सांगून टाकलं....

भास्कर जाधव यांच्या आरोपावर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावला. विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती सरकार नाही तर विधानसभेचे अध्यक्ष करतात, असे सांगून हा मुद्दा टोलावला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘आधी संख्या कमवा, त्यानंतर विरोधी पक्षनेतेपद मागा’, अशी टिंगल विरोधकांची उडविली.

1. विरोधी पक्षनेतेपदावरील वाद का निर्माण झाला?
सरकार विरोधी पक्षनेता नेमण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

2. विरोधी पक्षनेतेपदासाठी कोणती नावे चर्चेत आहेत?
भास्कर जाधव, आदित्य ठाकरे आणि सुरेश प्रभू ही नावे चर्चेत आहेत.

3. 10% सदस्यसंख्येचा नियम आहे का?
विरोधकांच्या मते असा कोणताही नियम घटनेत किंवा नियमावलीत नाही.

4. विरोधी पक्षनेता कोण नेमतं?
विधानसभेचे अध्यक्ष विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती करतात, सरकार नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com