अपात्र सरपंच, उपसरपंचाची निवडणूक पुन्हा रंगणार; न्यायालयीन पेच मात्र कायम

जिल्हाधिकाऱ्यांनी (Collector) निवडणूक प्रक्रियेचे आदेश दिले. मात्र, उच्च न्यायालयाच्या (High Court) निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
grampanchayat elections
grampanchayat electionsSarkarnama
Published on
Updated on

पुणे : दौंड तालुक्यातील कुरकुंभ ग्रामपंचायतीच्या 2018 मध्ये झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीचा (grampanchayat elections) खर्च वेळेत व विहित नमुन्यात न दिल्याने जनतेतून निवड झालेले सरपंच राहुल भोसले व उपसरपंच विनोद शितोळेंना विभागीय आयुक्तांनी अपात्र ठरविल्यानंतर जिल्हाधिकारी राजेश देशमुख (Pune Collector Rajesh Deshmukh) यांनी शुक्रवारी (ता.3 डिसेंबर) सरपंच व उपसरपंच पदासाठी निवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात संबंधित पदाधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयात (High Court) दाद मागितली असून न्यायालयाचा याबाबतचा निर्णय निवडी अगोदर की नंतर येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

grampanchayat elections
DCP- 25 हजार, PI- 85 हजार, PSI-1500 : पोलिसांच्या हप्त्याची पोलखोल!

कुरकुंभ ग्रामपंचायतीच्या 2018 - 2023 या पंचवार्षिक निवडणुकीत सरपंचपदी राहुल भोसले यांची जनतेतून निवड झाली होती. तर त्यांच्या पॅनेलचे 13 पैकी 11 सदस्य निवडून आले होते. त्यामध्ये अपात्र ठरविलेले उपसरपंच विनोद शितोळे यांचाही समावेश होता. निवडणूक खर्च वेळेत व विहित नमुन्यात सादर न केल्याने सरपंच राहुल भोसले यांना अपात्र ठरवावे अशी तक्रार संदीप भागवत व उपसरपंच विनोद शितोळे यांच्याविरुद्ध संदीप साळुंके यांनी केली होती.

grampanchayat elections
आंदोलनात एकाही शेतकऱ्याचा मृत्यू नाही! मदत देण्यास मोदी सरकारचा नकार

जिल्हाधिकाऱ्यांनी ही तक्रार फेटाळून लावल्यानंतर भागवत व साळुंके यांनी विभागीय आयुक्तांकडे अपिल केले होते. आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णय रद्द करून सरपंच व उपसरपंच यांना अपात्र ठरवण्याचा निर्णय दिला होता. या निर्णयामुळे गेल्या महिन्यापासून प्रशासक कुरकुंभ ग्रामपंचायतीचा कारभार पाहात आहे. अपात्रतेमुळे रिक्त झालेल्या सरपंच व उपसरपंच पदासाठी शुक्रवार 3 डिसेंबर 2021 रोजी निवडणूक घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दिले आहेत. त्यामुळे सरपंच व उपसरपंचपदी राहुल भोसले गटाच्या कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ग्रामपंचायतीत भोसले गटाचे सध्या दहा सदस्य असून विरोधी गटाचे दोन सदस्य आहेत.

विभागीय आयुक्तांनी दिलेल्या अपात्रतेच्या निर्णयाविरोधात राहुल भोसले व विनोद शितोळे यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक प्रक्रियेचे आदेश दिल्याने उच्च न्यायालय या निवडी अगोदर किंवा निवडीनंतर कोणता निर्णय देणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com