Solapur, 28 May : बारामती, शिरूरमधील स्ट्राँग रूम परिसरात सीसीटीव्ही बंद होण्याचे प्रकार घडल्यामुळे सोलापूर काँग्रेस सजग झाली आहे. स्ट्राँग रुमला चार कार्यकर्ते खडा पहारा देत असताना मतदान यंत्र ठेवलेल्या स्ट्राँग परिसरात आणि मतमोजणी केंद्राभवती जॅमर बसविण्यात यावेत. तसेच मोबाईलचे मनोरेही मतमोजणी पूर्ण होईपर्यंत बंद ठेवण्यात यावेत, अशी मागणी सोलापूर काँग्रेसकडून करण्यात आली आहे, त्यामुळे सोलापूर काँग्रेसने कशाचा धसका घेतला आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.
दरम्यान, सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या (Solapur Lok Sabha Constituency) काँग्रेसच्या (Congress) उमेदवार आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनीही ईव्हीएमबाबत भाष्य केले आहे. पराभव दिसू लागल्यामुळे भारतीय जनता पक्ष काहीही करू शकतो, त्यामुळे महाविकास आघाडीचे ‘ईव्हीएम’कडे (EVM) लक्ष आहे, त्याबाबत आम्ही सतर्क आहोत, असेही शिंदे यांनी म्हटले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
सोलापूर आणि माढा मतदारसंघाची मतदान यंत्रे सध्या सोलापूर शहरातील रामवाडी येथील शासकीय गोदामात ठेवण्यात आलेली आहेत. मोबाईल मनोरे अथवा वायफायच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी वापरलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे हँकिंग करून मते परिवर्तित करण्याची भीती नागरिकांना वाटत आहे. त्यामुळे मतदान यंत्रे ठेवलेली स्ट्राँग रूम परिसर आणि मतमोजणी केंद्राभोवती जॅमर बसवावा. तसेच, मोबाईल टॉवरही मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत बंद ठेवण्यात यावीत, अशी मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने (Congress delegation) जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे केली आहे.
काँग्रेसचे सोलापूर शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी सभागृह नेते बाबा मिस्त्री, माजी नगरसेवक प्रवीण निकाळजे, माजी नगरसेवक विनोद भोसले, मीडिया सेलचे तिरुपती परकीपंडला, नासीर बंगाली, सुभाष वाघमारे यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी तथा सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी कुमार आशीर्वाद यांना या मागणीचे निवदेन दिले आहे.
निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष राहावी, यासाठी निवडणूक आयोगाकडून सुरक्षात्मक उपाय योजना करण्यात याव्यात, अशी मागणीही काँग्रेसच्या शिष्टमंडळाने केली आहे.
सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे आमदार राम सातपुते आणि काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या निकराची लढाई झाली आहे. सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे रोजी मतदान झाले असून येत्या 4 जूनला मतमोजणी होणार आहे. रामवाडीच्या गोडावूनमध्ये मतदान यंत्रे ठेवून आज 21 दिवस होत आले आहेत. काँग्रेसच्या या मागणीवर निवडणूक आयोग काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. तसेच, भाजपची भूमिका काय असणार हेही पाहावे लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.