Solapur BJP : दोन्ही देशमुखांच्या धसक्याने महापौरांनी करवाढीचा प्रस्तावच बासनात गुंडाळला!

Vijaykumar Deshmukh-Subhash Deshmukh : सोलापूर महापालिकेत करवाढ प्रस्तावावरून राजकीय संघर्ष वाढला असून देशमुखांच्या हालचालींमुळे महापौरांनी करवाढ होणार नसल्याचे स्पष्ट करत भाजपवरचा दबाव वाढलेला दिसतो.
Subhash Deshmukh-Vijaykumar Deshmukh-Vinayak kondyal
Subhash Deshmukh-Vijaykumar Deshmukh-Vinayak kondyalSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 17 April (प्रमिला चोरगी) : सोलापूर महापालिकेत शह-कटशहाचे राजकारण सत्तेवर आल्याच्या पहिल्या दिवसापासून सुरू आहे. कोणतीही करवाढ करणार नसल्याचे आश्वासन भाजपने महापालिका निवडणुकीच्या जाहीरनाम्यात दिले आहे. मात्र, करवाढीचा प्रस्ताव पलिकेच्या कामकाज आल्याचे लक्षात येताच दोन्ही देशमुखांनी ‘इंद्रभवन’ गाठले. करवाढीला विरोध दर्शविण्यासाठी दोन्ही देशमुख पालिकेत येणार असल्याची कुणकूण लागताच महापौर विनायक कोंड्याल व शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी कोणतीही करवाढ करणार नसल्याचे जाहीर केले.

सोलापूर शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी राज्य सरकारकडून योजना राबवली जात आहे. त्या योजनेसाठी महापालिका हिश्याचा ३५० कोटींचा निधी उभारण्यासाठी शहरातील मिळकतींचा करवाढीचा प्रस्ताव २० एप्रिल रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेसाठी प्रशासनाकडून सभागृहात आणला होता. मात्र, दोन्ही देशमुखांमुळे तो हाणून पाडला गेला.

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेचे विषय हे महापौरांच्या परवानगीनेच अजेंड्यावर घेतले जातात. त्याची सखोल माहितीही घेतली जाते. मोठा प्रकल्प असल्यास शहरातील आमदार, पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून विषय प्रस्तावित केला जातो. पाणी योजनेच्या १४०० कोटींच्या विषयाबाबत आयुक्तांनी शहरातील आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख यांच्याशी संवाद साधला नव्हता. पालिकेतील पदाधिकाऱ्यांनीही पक्षांतील नेत्यांसोबत चर्चा केली नाही.

प्रशासनाने प्रस्ताव दिला आणि पदाधिकाऱ्यांनी त्यातील करवाढ न पाहता तो विषय सभा पटलावर आणला. दोन्ही आमदारांना त्याचे नोटीफिकेशन आज मिळाले. त्यात करवाढीचा उल्लेख असल्याने दोन्ही देशमुखांनी पालिकेत येऊन आयुक्तांची भेट घेण्याचे निश्चित केले.

Subhash Deshmukh-Vijaykumar Deshmukh-Vinayak kondyal
Krishna Sugar Election : इंद्रजित मोहितेंच्या ‘सायलेंट मोड’ने कार्यकर्त्यांचे वाढविले टेन्शन; भोसले, आबासाहेब मोहिते गटाचा शड्डू

दोन्ही देशमुख शुक्रवारी दुपारी चार वाजता करवाढीच्या प्रस्तावाबाबत आयुक्तांची भेट घेणार असल्याची कुणकुण लागताच महापौर विनायक कोंड्याल यांनी दुपारी तीनलाच पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली. आयुक्तांनी तातडीने विषय पाठविल्याने अजेंड्यावर घेतला. कोणतेही करवाढ होणार नाहीत. करवाढीच्या प्रस्ताव घ्यायचा की नाही, याची पक्षाच्या बैठकीत चर्चा केली जाईल. शहरातील तीनही आमदारांशी चर्चा करण्यात येईल, असे महापौर कोंड्याल यांनी स्पष्ट केले.

Subhash Deshmukh-Vijaykumar Deshmukh-Vinayak kondyal
Women Reservation : ‘महिला आरक्षणाच्या आडून मोदी सरकारचं मोठं षडयंत्र; ही बेईमानी आम्ही यशस्वी होऊ देणार नाही’

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीतच निर्णय होणार

पालकमंत्री जयकुमार गोरे हे रविवारी (ता. 19 एप्रिल) सोलापुरात येणार आहेत. त्यांच्याशी चर्चा करून करवाढीबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. पुरवणी अजेंडा जाहीर झाल्यानंतर पक्षाच्या बैठकीत करवाढीसंदर्भात चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे, असे महापौर विनायक कोंड्याल, सभागृह नेते नरेंद्र काळे, नगरसेवक रोहिणी तडवळकर यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com