Shivsena Vs NCP SP : शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादीतील वादाचे नवे केंद्र भाजी मार्केट; कामावरून दोन्ही पक्ष आमने-सामने

Jayant Patil Politics : आगामी 'स्थानिक'वरून सांगलीचे राजकारण चांगलेच तापतं चालले असतानाच आता यात इस्लामपूरमधील नवे भाजी मार्केट वादाचे केंद्र ठरले आहे.
Jayant Patil Politics
Jayant Patil Politicssarkarnama
Published on
Updated on

Sangli News : राज्यात गेल्या तीन ते चार वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे आता सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. तर जयंत पाटलांना खिंडीत गाठण्याचा डाव महायुतीने आखला आहे. यासाठी रणनीती आखली जात असून सध्या जिल्ह्यातले राजकीय वातावरण चांगले तापले आहे. अशातच आता इस्लामपूरमधील नवे भाजी मार्केट वादाचे केंद्र ठरत आहे. येथे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील विरोद्ध शिवसेना (शिंदे) असा वाद सुरू झाला आहे.

इस्लामपूर शहरात नवे भाजी मार्केट प्रस्तावित असून त्यासाठी 52 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. तर हा निधी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार यांनी पाठपुराव्यामुळे आला आहे. आता नव्या भाजी मार्केट इमारतीच्या कामावरून येथे मतभेद समोर आले असून वादाला तोंड फुटले आहे. इमारतीच्या कामाचे भुमिपूजन दीड वर्षांपूर्वीच झाले असून अद्याप कामाचा पत्ता नाही. पण आता स्थानिकची घोषणा होताच पावसाळ्याच्या तोंडावर कामाला सुरूवात करण्यात येणार आहे.

या कामासाठी येथील व्यापाऱ्यांना गाळे खाली करण्याचे आदेश काढण्यात आले आहे. यावरून व्यापाऱ्यांनी देखील पावसाळ्याच्या तोंडावर काम काढू नये किंवा निवाऱ्याची सोय करावी अशी मागणी केली आहे. याच मागणीवरून व्यापाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) प्रदेशाध्य जयंत पाटील यांची भेट घेत यात हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. यावरून येथे आता शिवसेना विरूद्ध राष्ट्रवादी असा सामना सुरू झाला आहे.

Jayant Patil Politics
Shivsena Vs NCP-SP : शरद पवारांना रत्नागिरीत उदय सामंतांचा दे धक्का! थेट प्रदेश उपाध्यक्षचं फोडला

यावरून राष्ट्रवादीचे शहाजी पाटील यांनी शिवसेसह नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना थेट सवाल करताना टीका केली आहे. त्यांनी, व्याापाऱ्यांना गाळे खाली करण्याचे अधिकार माजी नगरसेवकांना कोणी दिले? असे आदेश देण्यात आधी पालिकेनं व्यापाऱ्यांच्या निवाऱ्याची सोय करावी आणि नंतरच इमारतीच्या कामाला सुरूवात करावी. आमचा विकास कामांना विरोध नाही. पण आधी व्यापाऱ्यांच्या अडचणी सोडवा, असे म्हटलं आहे.

पाटील यांच्या या टीकेला उत्तर देताना आनंदराव पवार यांनी पलटवार केला आहे. त्यांनी या इमारतीमुळे व्यापाऱ्यांना चांगली सोय होणार आहे. मग विरोध कशासाठी. पण काही लोक फक्त श्रेयासाठी अशापद्धतीने काम सुरू करायला विरोध करताना दिसत आहेत. पण हे काम लवकरच सुरू होणार असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.

शिवसेना जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना नव्या मार्केटसाठी 52 कोटींचा निधी आणला. 2.53 हजार चौ.फूट जागेवर पाच मजली मारत बांधण्यात येणार असून यात फळव फूल मार्केट, बहूउद्देशिय सभागृह, नाट्यगृह व पार्किंगसह सिनेमागृह करण्यात येणार आहे. याचे उद्घाटन झाले असून निधी येऊन अडीच वर्षांचा कालावधी लोटला आहे. पहिला टप्प्यातील 15 कोटींचा निधी देखील मिळाला असून कामाला मात्र सुरूवात झालेली नाही.

Jayant Patil Politics
Congress Vs NCP SP : 'आम्ही फक्त काँग्रेसच्या सतरंज्या उचलायच्या का..?'; राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचा संयम संपला

पण आता पावसाच्या तोंडावर काम सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला असून व्यापाऱ्यांची मात्र तारांबळ उडाली आहे. याबाबत जयंत पाटील यांनी देखील व्यापाऱ्यांचे म्हणण ऐकून घेतलं असून पालिका आता यावर कोणता मार्ग काढते याकडे व्यापाऱ्यांसह दोन्ही पक्षांचे लक्ष लागून राहिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com