Koregaon News : दंगली घडवण्यासाठीच भाजप भुजबळांना धमकावत नसेल ना : भास्कर जाधवांना संशय

Bhaskar Jadhav कोरेगावात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव आले होते. त्यावेळी शासकीय विश्रामगृहात त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला.
Chhagan Bhujbal, Bhaskar Jadhav
Chhagan Bhujbal, Bhaskar Jadhavsarkarnama
Published on
Updated on

-पांडुरंग बर्गे

Koregaon Political News : भारतीय जनता पक्षाचा एखादा वरिष्ठ नेता ओबीसी नेते तथा अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांना तुम्ही जामिनावर बाहेर आहात, याची जाणीव करून देऊन दोन्ही समाजात जातीय दंगली घडतील अशी वक्तव्ये करा, अशी धमकी तर देत नसेल ना, असा संशय शिवसेनेचे (उबाठा) आमदार भास्कर जाधव यांनी आज कोरेगाव येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

कोरेगावात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आमदार भास्कर जाधव Bhaskar Jadhav आले होते. त्यावेळी शासकीय विश्रामगृहात त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. जाधव म्हणाले, जालना येथे काल झालेल्या ओबीसी - भटके विमुक्त आरक्षण बचाव एल्गार सभेत भुजबळ Chhagan Bhujbal यांनी मोठा आवेश आणि जोशात भाषण केले. तसेच मराठा आरक्षणाला विरोध करत आव्हानात्मक भाषेत टीका केली.

हे लक्षात घेतले तर त्यांना कोणीतरी जातीय दंगली घडविण्यासाठी उचकवत आहे काय? हे विचारण्याची वेळ आली आहे, असेही जाधव म्हणाले. मंत्री असताना मंत्रिमंडळात तुम्ही मराठा आरक्षणाला विरोध करत नाही. मात्र, बाहेर आल्यानंतर अगदी राणा भीमदेवी थाटामध्ये आरक्षणाला विरोध करत आव्हान देत आहेत. याचाच अर्थ त्यांचा बोलवता धनी कोणीतरी अन्य असावा हे नक्की.

स्वतःच्या विधानसभा मतदारसंघातील एक पूर्ण झालेला पूल ज्याचे स्ट्रक्चरल ऑडिट, रंगरंगोटी झालेली आहे. तो आदित्य ठाकरे यांनी बॅरिकेट बाजूला करून जनतेसाठी खुला केला. यात गुन्हा काय आहे? तरी त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला असून, त्याचा आम्ही निषेध करत आहोत. मात्र, हा गुन्हा म्हणजे लढवय्या नेत्यांसाठी स्टार असतो. तसा तो आदित्य ठाकरेंसाठी स्टार ठरेल असेही जाधव यांनी नमूद केले.

Chhagan Bhujbal, Bhaskar Jadhav
Satara Maratha Reservation : मराठ्यांच्या राजधानीत ४० हजार कुणबी नोंदी; युद्धपातळीवर तपासणी सुरू

राणेंची दोन्ही पोरं महाराष्ट्राला लागलेला कलंक...

नारायण राणे हे विस्मृतीत गेलेले नेते आहेत. मागील आठ ते नऊ वर्षांत त्यांची ५०० लोकांची सभा आपण कोठे झाल्याचे ऐकलेले आहे का? उद्धवसाहेब ठाकरे जे बोलतील त्यावर टीका करत मै भू हू एवढंच दाखवण्याचा ते सतत प्रयत्न करत असतात. त्यांची दोन्ही पोरं म्हणजे महाराष्ट्राला लागलेला एक कलंक आहे, असेही जाधव म्हणाले. Maharashtra Political News

आमदार अपात्रताप्रकरणी बोलताना जाधव म्हणाले, "आमदार अपात्र ठरवण्यासाठी किती वेळ घ्यावा, यासाठी अखेर सर्वोच्च न्यायालयाने अध्यक्षांना कालमर्यादा घालून दिली. तरीही अध्यक्ष निर्णय घेत नाहीत. ते केंद्र आणि राज्य सरकारला अभिप्रेत काम करत असून, त्यामुळे त्यांनी अध्यक्षपदाचा घटनात्मक दर्जाच घालवला आहे. देशातील घटना, संविधान, लोकशाही संपुष्टात आणण्याचे काम भाजप करत असून, ते हाणून पाडण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे, असेही जाधव यांनी नमूद केले.

Edited By : Umesh Bambare

Chhagan Bhujbal, Bhaskar Jadhav
Maha Vikas Aghadi: लोकसभा जागावाटपाबद्दल 'मविआ'चं काय ठरलं ? शरद पवारांचं मोठं विधान

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com