

Baramati, 23 April : बारामतीत 2029 मध्ये पवार विरुद्ध पवार अशी लढत होऊ शकते, असे विधान आमदार रोहित पवार यांनी केले होते. त्यावर राज्याच्या राजकारणात पुन्हा चर्चेला उधाण आले होते. मात्र, जय पवार यांनी ‘आम्ही कुटुंब म्हणून एकत्र राहिलं पाहिजे. तसेच माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ घेण्यात आला आहे. रोहित पवार यांनी बारामतीत 2029 मध्ये पवार विरुद्ध पवार अशी लढाई होईल, असे म्हटले आहे. पण आमची कोणाचीही तशी इच्छा नाही, असे स्पष्टपणे सांगितले आहे.
बारामतीत दुपारी माध्यमांशी बोलताना जय पवार (Jay Pawar) यांनी आपल्या सकाळच्या विधानावरून युटर्न घेतला आहे. त्यांनी सकाळी माध्यमांशी बोलताना 2029 मध्ये बारामतीतून निवडणूक लढवावी, अशी आमच्या लोकांची इच्छा आहे, असे म्हटले होते. त्यानंतर दुपारी माझी कार्यकर्ता म्हणून काम करण्याची इच्छा आहे, असे स्पष्टीकरण दिले आहे.
जय पवार म्हणाले, मी सकाळी जे बोललो, त्याचा अर्थ तुम्ही चुकीचा घेतला. मी सकाळीही बोललो की, २०२९ मध्ये मी बारामतीतून (Baramati) विधानसभेची निवडणूक लढवावी, अशी आमच्या लोकांची मागणी आहे. पण, मला पक्षासाठी एक कार्यकर्ता म्हणून काम करायचं आहे. मी सगळ्यांसोबत कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे.
बारामती नगराध्यक्षपदासाठीही माझे नाव चर्चेत आले होते. त्यावेळी मी अजितदादांना ‘मला एक कार्यकर्ता म्हणूनच काम करायचे आहे,’ असे सांगितले होते. बारामतीतून कोणी निवडणूक लढवायची, हे ठरविण्याचा अधिकार तुम्हाला नाही तर आमचा आहे, असेही जय पवार यांनी नमूद केले.
ते म्हणाले, रोहित पवार कायतरी बोलले आहेत. पण, युगेंद्र पवार यांनी ‘आधीही असं लढायला नको होतं, अशी इच्छा बोलून दाखवली आहे. मलाही तसंच वाटतंय की, कुटुंब म्हणून आम्ही एकत्र राहिलं पाहिजे. मी ते सारखं बोलत आहे.
ती श्रीनिवासकाकांची इच्छा
रोहित पवार यांनी बारामतीत २०२९ मध्ये पवार विरुद्ध पवार होईल, असे म्हटलं आहे. पण, आमची कोणाचीही तशी इच्छा नाही. श्रीनिवासकाकाही ‘मी निवडणूक लढवेल, तसे बोलले असतील. पण, माझ्या मनात तशी इच्छा नाही. कार्यकर्ता म्हणून काम करण्याची माझी इच्छा आहे. बारामतीतील लोकांची अजितदादांप्रमाणे सेवा करणार आहे. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा मुद्दा दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेते घेतील, असेही जय पवार यांनी स्पष्ट केले.
अजितदादा अन॒ सुनेत्रावहिनींचा एकत्र विक्रम होणार
जय पवार म्हणाले, अजितदादा पवार यांच्याशिवाय मतदानाला समोरे जावे लागेल असं कधी वाटल नव्हतं. मनात दादांच्याच आठवणी आहेत. आम्ही सकाळी गावोगावी जात होतो. त्यावेळी चांगला प्रतिसाद होता. मात्र, दुपारी उन्हामुळे जरा कमी झाला. चारनंतर परत वाढत गेला. दुपारी चारपर्यंत ६० टक्के मतदान झाले तर दोन लाखांनी सुनेत्रावाहिनी निवडून येतील. मताधिक्क्याचा विक्रम अजितदादा आणि वहिनींचा एकत्र होणार.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.