Sharad Pawar : राहुल गांधी, उद्धव ठाकरे यांच्यासमोरच शरद पवारांची 'ही' मोठी घोषणा

Political News : राज्यातील शेतकरी वर्गासाठी मोठी घोषणा करताना त्यांनी ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात येणार असल्याचे सांगत येत्या काळात राज्यात आघाडी सरकार आल्यानंतर कृषी समृद्धी योजना राबविणार असल्याची घोषणा ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी केली.
Sharad Pawar
Sharad Pawarsarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला राज्यातील जनतेने मोठी ताकद दिली. त्याचप्रमाणे येत्या विधानसभा निवडणुकीत सर्वजण आघाडीच्या पाठीशी उभे राहतील, असा विश्वास व्यक्त करीत त्यांनी राज्य सरकारच्या भ्रष्ट कारभारावर टीका केली. गेल्या काही दिवसांत राज्यातील महिलांवरील अत्याचार वाढले असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राज्यातील महायुती सरकारच्या कारभारावर निशाणा साधला.

त्यासोबतच राज्यातील शेतकरी वर्गासाठी मोठी घोषणा करताना त्यांनी 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात येणार असल्याचे सांगत येत्या काळात राज्यात आघाडी सरकार आल्यानंतर कृषी समृद्धी योजना राबविणार असल्याची घोषणा ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी केली.

मुंबईत महाविकास आघाडीची प्रचार सभा बुधवारी सायंकाळी पार पडली. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi), मल्लिकार्जुन खर्गे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नाना पटोले यांच्यासह आघाडीचे नेतेमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्यात येत्या काळात आमचे सरकार आल्यावर आम्ही कृषी समृद्धी योजना लागू करणार असल्याचे वक्तव्य त्यांनी केले. या योजनेच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्याचे 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना 50 हजारांचं प्रोत्साहन म्हणून आर्थिक मदत करणार असल्याचे पवार म्हणाले.

Sharad Pawar
Manoj Jarange : तुम्ही त्यावेळी झोपेत होते का ? जरांगेंचा राज ठाकरेंना खरमरीत टोला

राज्यातील शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरु आहे. मालवण येथील दुर्घटनेवरून राज्यातील भ्रष्टाचाराची स्थिती कळते. सर्वच क्षेत्रात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात बोकाळला असल्याचे सांगत त्यांनी राज्यातील महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला.

शेतकरी हा तुमच्या माझ्या भुकेची समस्या सोडवणारा राजा आहे. मात्र, सध्या तो सकंटात आहे. या भाजपच्या सरकारने शेतकऱ्यांच्या दु:खाकडे बघितलं नसल्याची टीका शरद पवार यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com