Jalgaon Politics: शहरात जळगाव महापालिकेची अतिक्रमण निर्मूलन कारवाई सुरू आहे. मात्र या कारवाईतून जळगाव शहरात मोठा वाद निर्माण झाला. त्यातून थेट महापौरांवरच बाका प्रसंग गुजरला.
महापालिकेच्या आवारात महापौर दीपमाला काळे दुपारी येत होत्या. यावेळी एका युवकाने थेट महापौरांच्या वाहनावरच लोखंडी रॉडने हल्ला केला. अचानक घडलेल्या या प्रकाराने एकच खळबळ उडाली.
अचानक झालेल्या या हल्ल्याने महापालिकेच्या आवारातील कर्मचारी देखील गडबडले. दरम्यान, चालकाने प्रसंगावधान राखून वाहन मागे घेत युवकाला बाजूला केले.
वाहन चालकाच्या या सावधगिरीने महापौरांवरील गंभीर प्रसंग टळला. घटनेनंतर महापौर दीपमाला काळे यांनी तातडीने आयुक्त आदित्य जीवने यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर आयुक्तांनी तातडीने प्रशासनाला सूचना केल्यावर या प्रकाराची पोलिसांत तक्रार करण्यात आली.
या धावपळीत हल्ला करणारा युवक प्रसार झाला. पालिकेने सुरू केलेल्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेत संबंधित युवकाची उसाच्या रसाची गाडी कारवाई करून जप्त केली होती. त्या रागातून हा प्रकार घडल्याचा संशय आहे.
महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेच्या कारवाईतून घडलेला हा प्रसंग गंभीर असल्याने प्रशासनाने तातडी दखल घेतली. शहरात अनाधिकृत व्यवसायांवर कारवाई करण्याचा निर्धार कायम ठेवत यापुढेही कारवाई सुरूच राहणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. महापालिका कार्यालयातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्याचा सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.