Elon Musk Starlink : राहुल गांधींनी एलॉन मस्क यांच्या 'त्या' पोस्टला दिलं उत्तर; 'अंबानी भारताचे बॉस' उल्लेखामुळे चर्चेला उधाण!

Elon Musk on Starlink India : एलॉन मस्क यांच्या पोस्टनंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही एक्सवर प्रतिक्रिया दिली. ‘Welcome to India, Elon. Wait till you discover the other guy,’ अशा शब्दांत त्यांनी मस्क यांचे भारतात स्वागत करत अप्रत्यक्षपणे आणखी एका व्यक्तीकडे लक्ष वेधले.
Elon Musk, Mukesh Ambani and Rahul Gandhi are at the centre of a debate over Starlink's India licence and satellite internet competition.
Elon Musk, Mukesh Ambani and Rahul Gandhi are at the centre of a debate over Starlink's India licence and satellite internet competition.Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Elon Musk Starlink : स्पेसएक्स आणि टेस्लासारख्या कंपन्यांचे प्रमुख एलॉन मस्क यांनी भारतातील उपग्रह इंटरनेट सेवा ‘स्टारलिंक’च्या परवान्याबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. भारतात स्टारलिंकला परवाना मिळण्यास विलंब होत असल्यामागे काही बड्या व्यावसायिकांची मक्तेदारी टिकवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप मस्क यांनी केला आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात त्यांनी रिलायन्स उद्योगसमूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांचा थेट उल्लेख केला आहे.

मस्क यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत भारतातील परवाना प्रक्रियेबाबत नाराजी व्यक्त केली. ‘स्टारलिंकला १६५ पेक्षा अधिक देशांमध्ये परवाने मिळाले आहेत. भारतात परवाना मिळवण्यासाठी सरकारचे सर्व कायदे आणि नियम पाळले. या प्रक्रियेत पाच वर्षे घालवूनही अद्याप परवाना का मिळालेला नाही? अंबानी हेच भारताचे खरे मालक आहेत का?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

नियामक संस्था आणि संबंधित यंत्रणांशी अनेक वर्षे चर्चा करूनही स्टारलिंकच्या भारतातील प्रवेशाला विलंब होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मस्क यांनी हे विधान केल्याचे दिसते. त्यांच्या या आरोपांमुळे भारतातील उपग्रह इंटरनेट सेवांच्या बाजारपेठेत स्पर्धा आणि परवाना प्रक्रियेबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

Elon Musk, Mukesh Ambani and Rahul Gandhi are at the centre of a debate over Starlink's India licence and satellite internet competition.
Sting Operation : काँग्रेस मंत्र्यांवर गुप्त पाळत? मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्याने कर्नाटकच्या राजकारणात खळबळ; केंद्रीय मंत्र्यालाही घेरले

राहुल गांधींचं मस्क यांना प्रत्युत्तर

एलॉन मस्क यांच्या पोस्टनंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही एक्सवर प्रतिक्रिया दिली. ‘Welcome to India, Elon. Wait till you discover the other guy,’ अशा शब्दांत त्यांनी मस्क यांचे भारतात स्वागत करत अप्रत्यक्षपणे आणखी एका व्यक्तीकडे लक्ष वेधले. राहुल गांधी यांच्या पोस्टला प्रतिसाद देताना मस्क यांनी त्यांचे आभार मानले. तसेच, ही बाब खरोखरच चिंताजनक असल्याचे त्यांनी म्हटले. त्यामुळे मस्क आणि राहुल गांधी यांच्या पोस्टची सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे.

नेमका वाद काय आहे?

एलॉन मस्क यांच्या स्टारलिंकला भारतात उपग्रहाधारित इंटरनेट सेवा सुरू करायची आहे. मात्र, या सेवेला परवाना मिळण्याच्या प्रक्रियेला विलंब होत असल्याचा त्यांचा आरोप आहे. दुसरीकडे, रिलायन्स जिओनेही उपग्रह इंटरनेट सेवांच्या क्षेत्रात प्रवेश करण्याची तयारी केली आहे. जिओकडून सुमारे १,६०० लो अर्थ ऑर्बिट (LEO) उपग्रहांचे जाळे उभारण्याची योजना असल्याची माहिती समोर आली आहे.

Elon Musk, Mukesh Ambani and Rahul Gandhi are at the centre of a debate over Starlink's India licence and satellite internet competition.
Gyanesh Kumar SIR Controversy : SIR वादात नवा ट्विस्ट; 42 माजी न्यायमूर्तींचं समर्थन, गोपाला गौडांची ज्ञानेश कुमारांना अडचणीत आणणारी मागणी काय?

याच पार्श्वभूमीवर जिओच्या संभाव्य प्रवेशामुळे स्टारलिंकच्या परवान्याला विलंब होत आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र, जिओच्या योजनेचा आणि स्टारलिंकच्या परवाना प्रक्रियेतील विलंबाचा थेट संबंध असल्याचे स्वतंत्रपणे सिद्ध झालेले नाही. हा संबंध असल्याचा आरोप मस्क यांनी केला आहे.

सरकारने काय स्पष्टीकरण दिलं?

एलॉन मस्क यांच्या आरोपांवर केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. उपग्रह दळणवळण सेवांसह सर्व दूरसंचार सेवांसाठी सरकारने निष्पक्ष आणि भेदभावाला थारा न देणारी नियामक चौकट तयार केली असल्याचे सरकारने म्हटले आहे. ही व्यवस्था भेदभाव करणारी असल्याचा आरोप निराधार असल्याचेही सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे स्टारलिंकच्या परवान्याबाबतचा वाद आता मस्क यांचे आरोप, राहुल गांधी यांची प्रतिक्रिया आणि सरकारच्या स्पष्टीकरणामुळे चर्चेत आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com