Satej Patil : बंटी पाटलांनी स्वतःचे हॉटेल, हॉस्पिटल अन् कॉलेज वाढवले, पण कोल्हापुरसाठी..? शिंदेंचा शिलेदार तुटून पडला

Rajesh Kshirsagar counters Satej Patil’s Kolhapur Files : काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना कोल्हापूर फाइल्स काढली होती.
Kolhapur Files controversy; Rajesh Kshirsagar And Satej Patil
Kolhapur Files controversy; Rajesh Kshirsagar And Satej Patilsarkarnama
Published on
Updated on
Summary
  • आमदार सतेज पाटील यांनी ‘कोल्हापूर फाइल्स’ सादर करत महायुतीवर विकासाबाबत गंभीर आरोप केले.

  • प्रत्युत्तरादाखल राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषद घेऊन सतेज पाटलांची राजकीय कुंडलीच मांडली.

  • कोल्हापूरच्या रस्ते आणि विकासावरून महायुती व काँग्रेसमधील राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाला आहे.

Kolhapur News : काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार परिषद घेत महायुतीला कोल्हापूरच्या रस्त्यांबाबत आणि विकासांबाबत जबाबदार धरले होते. त्यांनी कोल्हापूर फाइल्स काढत महायुतीचा पंचनामा जनतेसमोर मांडला होता. यामुळे शहराचे राजकारण तापलं होते. पण आता सतेज पाटलांच्या या आरोपांना राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी तिखट उत्तर दिलं आहे. त्यांनी आमदार सतेज पाटील यांची कुंडलीच काढली असून जोरदार टीका केली आहे. आज (ता.४) सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेला आमदार राजेश क्षीरसागर, शिवसेना जिल्हाप्रमुख विजयराव बलुगडे, सुजित चव्हाण, माजी आमदार जयश्री जाधव उपस्थित होते.

यावेळी क्षीरसागर म्हणाले, काल आमच्या विरोधकांनी आमच्यावर टीका केली. त्यांना प्रत्युत्तर देणे अपेक्षित आहे. चुकीचा गैरसमज सेट करणारा राज्यातील किंग म्हणजे बंटी पाटील. आम्ही विकास काम सुरू केली म्हणून लोकांनी तुमची १० -० ने घंटी वाजवली. १०० कोटी रस्त्याची वर्क ऑर्डर झाली नसेल तर मी राजकीय संन्यास घेतो. पण जर ती झाली असेल तुम्ही संन्यास घ्या, असे जाहीर आव्हानही क्षीरसागर यांनी केले आहे.

निवडणूक आली की चुकीच्या भूमिका सांगून लोकांचा माईंड सेट करायचा. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कामाचा दाखला देत फाऊंटनवरून टीका केली. पण रंकाळाजवळ फाऊंटन बसवतो मग त्यावर बोला. जर ५५ लाख रुपयाला मिळत असेल तर शहरातील सर्व तलावांचा ठेका तुम्हाला देतो. टोलमध्ये काय झालं त्याचे चिंतन केले का? टोलची पावती तुम्हीच फाडली असे म्हणतं टोलाही क्षीरसागर यांनी लगावला.

Kolhapur Files controversy; Rajesh Kshirsagar And Satej Patil
Congress Vs Shivsena UBT : प्रणिती शिंदेंच्या दारात गेला तर पक्षातून हाकलेन : ठाकरेंच्या नेत्याचा सज्जड दम; सोलापूरात वाद टोकाला

थेट पाईपलाइनमध्ये विधानसभेच्या पायरीवर मी आंदोलन केले. मी आंदोलन केले म्हणून मंजूर झाली. पण त्याचे श्रेय तुम्ही घेतलात. पाईपलाइन खरेदीमध्ये ७० कोटीचा ढपाला पडला. असा आरोप आता तुमच्या आमदारांकडून होतोय. तुम्ही कोल्हापुरसाठी काय केले? याचे उत्तर द्यावे.

महायुती म्हणून चांगला प्लॅन आम्ही कोल्हापुरला देतोय. सातत्याने सत्तेत आम्ही होतो हे सांगताय. होय आम्ही सत्तेत होतो पण तेही नाईजलाणे. तुम्ही केवळ आम्हाला परिवहन दिले. पण सर्वाधिकार तुम्ही वापरले. तुम्ही स्वतःचे कॉलेज, हॉटेल, हॉस्पिटल वाढवले, जागा घेतल्या पण कोल्हापुरसाठी काय केलतं? तेही एकदा सांगा असा सवाल क्षीरसागर यांनी केला.

रस्त्यावर टीका करून करून आता बंटी पाटील दमलेत. पावसामुळे रस्ते खराब झाले पण त्याचे खापर महायुतीवर फोडले. रात्री बारा वाजता उठून रस्त्याची कामे केली. मात्र तुम्हाला शहरवासियांना अजून पाणी देता आलेलं नाही.

पण आता तुमचे खोटे नाटे आरोप जनता खपवून घेणार नाही. महापालिकेचे ५४३ कर्मचारी आम्ही कायम केले? ते ही तुम्ही कायम करू शकला नाहीत. उलट विकासकाबाबत गैरसमज पसरवला जातोय. २०१५ ला आम्ही भाजप विरोधात लढलो जी आमची चूक होती. त्यामुळे मी जनतेला दिलगिरी व्यक्त करतो, असेही आमदार क्षीरसागर म्हणाले.

Kolhapur Files controversy; Rajesh Kshirsagar And Satej Patil
Shivsena Vs Congress: काँग्रेसला मुंबईच्या महापौरपदाचं स्वप्नं, ठाकरेंची शिवसेना 'अलर्ट'; राऊतांनी इंडिया आघाडीपासून सगळंच काढलं

FAQs :

Q1. ‘कोल्हापूर फाइल्स’ म्हणजे काय?
➡️ कोल्हापूरच्या रस्ते व विकासाबाबत महायुतीवर करण्यात आलेले आरोप.

Q2. सतेज पाटील यांनी कोणावर आरोप केले?
➡️ सत्ताधारी महायुतीवर शहराच्या विकासासाठी जबाबदार असल्याचा आरोप केला.

Q3. राजेश क्षीरसागर यांनी काय प्रत्युत्तर दिले?
➡️ सतेज पाटील यांच्या कार्यकाळाचा पंचनामा करत आरोप फेटाळले.

Q4. पत्रकार परिषदेला कोण उपस्थित होते?
➡️ राजेश क्षीरसागर, विजयराव बलुगडे, सुजित चव्हाण, जयश्री जाधव आदी.

Q5. या वादाचा राजकीय परिणाम काय होऊ शकतो?
➡️ आगामी महापालिका निवडणुकीत हा मुद्दा महत्त्वाचा ठरू शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com