Satara DCC Bank : गोरेंनी जिल्हा बँकेतील पराभवाची जबाबदारी घेतली; पण मकरंदआबा अन्‌ शंभूराज देसाईंना कडक इशारा : ‘मी कधीच राजकीय संघर्ष अर्धवट सोडत नाही...’

Jaykumar Gore Warning To Shivsena-NCP : सातारा जिल्हा बँक निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी स्वीकारली. राजकीय संघर्षातून पुढे आल्याचे सांगत त्यांनी भविष्यातही संघर्ष सुरू ठेवण्याचा इशारा दिला.
Satara Dcc Bank
Satara Dcc BankSarkarnama
Published on: 
Updated on: 

Satara, 20 November : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीतील आणि पदाधिकारी निवडीतील पराभवाची जबाबदारी कुणी घ्यायची आवश्यकता नाही. ती जबाबदारी माझी आहे. मी कधीही जबाबदारी झटकत नाही. माझा राजकारणातील जन्मच फार मोठ्या राजकीय संघर्षातून झाला आहे. माझ्या आयुष्यातील कोणताच राजकीय संघर्ष मी अर्धवट सोडला नाही, त्यामुळे असे संघर्ष मी भविष्यातही करत राहीन, असा इशारा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिला.

सातारा जिल्हा बॅंकेचा अध्यक्ष हा भारतीय जनता पक्षाचा होईल, अशी चर्चा असताना राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या खेळीमुळे ती चर्चा प्रत्यक्षात येऊ शकली नाही. अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे उदयसिंह पाटील उंडाळकर, तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे दीपक चव्हाण यांची नियुक्ती झाली. त्यामुळे भाजप नेत्यांच्या स्वप्नाला सुरुंग लागला. त्यानंतर जिल्हा बॅंकेतील पदाधिकारी निवडीवरून भाजपचे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि जयकुमार गोरे यांच्यात टीकाटिपण्णी झाली झाली होती. त्या पार्श्वभूमीवर गोरेंनी पराभवाची जबाबदारी स्वीकारण्याबाबत केलेले भाष्य महत्वपूर्ण मानले जात आहे.

सत्ता असो किंवा नसो, मी कायमच लढत आलो आहे आणि यापुढेही लढत राहीन. मुख्यमंत्र्यांनी महायुती केली म्हणून त्यांच्या कृपेने आजचे चित्र उभे राहिले आहे, हे कुणी विसरु नये. बदल्याची आणि जखमा भरण्याची भाषा करणाऱ्यांच्यात दम होता तर त्यांनी समोरासमोर लढाई करायची होती, असे आव्हानही गोरे यांनी सहकारी मित्रपक्षांना दिले.

Satara Dcc Bank
Eknath Shinde Pandharpur Tour : कलेक्टर, एसपींचा सल्ला अन्‌ आमदार राजू खरेंची विनंती; एकनाथ शिंदेंचा हेलिकॉप्टरऐवजी मोटारीने पुण्याला जाण्याचा निर्णय

मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, आजपर्यंत भाजपने माझ्यावर जी जबाबदारी दिली, ती मी इमानेइतबारे पार पाडली आहे. सत्ता असो किंवा नसो, मी कायमच लढत आणि संघर्ष करत आलो आहे. भविष्यातही माझी लढाई सुरुच रहाणार आहे.

Satara Dcc Bank
Rajan Patil : राजन पाटील ठरले ‘धुरंधर’; सोलापूर Dccत एकाचवेळी दोन्ही चिरंजीवांची बिनविरोध एन्ट्री, मोहिते पाटलांनंतर साधली किमया...

सातारा जिल्हा बॅंक निवडणुकीत आणि पदाधिकारी निवडीत काय घडले, या सर्वच राजकीय गोष्टी उघड पटलावर आणायच्या नसतात. वेळ आली तर त्याही गोष्टी समोर आणल्या जातील. मी महायुतीचा धर्म प्रामाणिकपणे पाळला. ज्यांनी महायुती धर्म पाळला नाही त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, असा सल्लाही जयकुमार गोरे यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीला दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.