Madha Loksabha : विजयदादांच्या उपस्थितीतच जयसिंह मोहिते पाटलांचा माढ्यातून लोकसभा लढविण्याचा निर्धार

Jayshinh Mohite Patil : भाजपने मोहिते पाटील यांना तिकीट नाकारले, तर ते कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार, हेही पाहावे लागणार आहे.
Jayshinh Mohite Patil
Jayshinh Mohite PatilSarkarnama

Solapur News : माढा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीचा भाजपमध्ये असलेला तिढा काही केल्या सुटायचे नाव घेताना दिसत नाही. कारण, मोहिते पाटलांना आज पुन्हा एकदा माढ्यातून लोकसभेची निवडणूक लढविण्याचा निर्धार करताना भाजपला इशारा दिल्याचे मानले जात आहे. माढ्यातून कोणी निवडणूक लढू अथवा न लढो. मी लोकसभेची निवडणूक लढविणार आहे, असा इशारा अकलूज येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील यांनी दिला. (Mohite Patil News)

सदाशिवनगर येथील श्री शंकर सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली आहे. या कारखान्याच्या 21 पैकी 19 जागा बिनविरोध झाल्या आहेत, तर उर्वरित दोन जागांसाठी निवडणूक लागली आहे. त्या उमेदवाराच्या प्रचाराच्या शुभारंभाच्या सभेत जयसिंह मोहिते पाटील लोकसभेची निवडणूक लढविण्याचा निर्धार बोलून दाखवला. यावर भाजपची प्रतिक्रिया काय असणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष असणार आहे. (Mahayuti News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Jayshinh Mohite Patil
Vilasrao Deshmukh : विधान परिषदेला अर्ध्या मताने पराभव ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री : विलासराव देशमुख

जयसिंह हे मोहिते पाटील घराण्याचे निवडणूक रणनीतीकार म्हणून ओळलखे जातात. त्यामुळे जयसिंह यांच्या दाव्याला विशेष महत्व आहे. निवडणूक लढविण्याचा निर्धार त्यांनी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आणि इतर महत्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत बोलून दाखवला आहे. (BJP News)

एकीकडे माढ्यातून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना तिकिट मिळण्याचे संकेत भाजपचे नेते देत असताना दुसरीकडे मोहिते पाटीलही लोकसभेची निवडणूक लढविण्याचा निर्धार वारंवार बोलून दाखवत आहेत. त्यामुळे माढ्याच्या निवडणुकीकडे संपूर्ण सोलापूर आणि सातारा जिल्ह्याचे लक्ष असणार आहे.

धैर्यशील मोहिते पाटील यांनीही लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. माढा मतदारसंघातून त्यांनी प्रचाराच्या दोन ते तीन फेऱ्याही पूर्ण केल्या आहेत. रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि मोहिते पाटील यांच्यामध्ये टोकाचे मतभेद आहेत. पण, भाजपत पक्षशिस्त महत्त्वाची मानले जाते, त्यामुळे मोहिते पाटील लोकसभेची निवडणूक लढवणार का, अशी चर्चा सुरू असतानाच आज जयसिंह मोहिते पाटील यांनी केलेल्या विधानाला विशेष महत्त्व आहे.

Jayshinh Mohite Patil
Solapur NCP : चारच दिवसांपूर्वी अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश अन्‌ थेट महापौर होण्यासाठी शुभेच्छा!

जयसिंह मोहिते पाटील म्हणाले, सदाशिवनगर येथील श्री शंकर सहकारी साखर कारखान्याची ही पंचवार्षिक निवडणूक म्हणजे लोकसभेची रंगीत तालीम आहे. या निवडणुकीत आपल्याला सजगपणे काम करायचे आहे. लोकसभेची निवडणूक कोणी लढवू अथवा न लढवो. माढ्यातून मी लोकसभेची निवडणूक लढवणार आहे.

माढा लोकसभा मतदारसंघातून कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवण्याच्या मनसुबा मोहिते पाटील घराण्यातून वारंवार दर्शविला जात आहे. त्यामुळे भाजपने मोहिते पाटील यांना तिकीट नाकारले, तर ते कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार, हेही पाहावे लागणार आहे. दरम्यान, रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनीही प्रचाराला सुरुवात केली आहे. विविध नेत्यांबरोबर ते थेट जनतेशी संवाद साधत आहेत. मोहिते पाटील यांनीही माढा मतदारसंघातील आपल्या गटाला कामाला लावले आहे.

Jayshinh Mohite Patil
Shirur Loksabha : अजितदादांच्या मनात नेमकं चाललंय काय? कोल्हेंचा पराभव करणारा शिरूरमधील उमेदवार कोण?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com