
थोडक्यात बातमी :
म्हाकवे ग्रामस्थांनी जिल्हा परिषद गटाच्या फोडाफोडीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
ग्रामस्थांनी म्हाकवे व परिसरातील गावे एकत्र करून स्वतंत्र जि.प. मतदारसंघ तयार करण्याची मागणी केली आहे.
जर प्रशासनाने मागणी मान्य केली नाही, तर येणाऱ्या निवडणुकीत मतदान बहिष्कार आणि कर्नाटकमध्ये जाण्याचा इशारा दिला आहे.
Kolhapur News : राजकीय विद्यापीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कागल विधानसभा मतदारसंघात सध्या नव्या वादाला तोंड फुटले आहे. येथील जिल्हा परिषद गट आणि गण रचनेत देखील राजकीय कुरघोडी दिसून आली आहे. जिल्हा प्रशासनाकडून तयार करण्यात आलेल्या रचनेला आता ग्रामस्थांनीच आव्हान दिले आहे. तर ज्या गावात महाविकास आघाडीचे नेते आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीत घाटगे आणि भाजपचे नेते माजी आमदार संजय बाबा घाटगे यांची ताकद अधिक आहे. तर अनेक गावात फिफ्टी फिफ्टी ताकद आहे. पण विद्यमान जागेवर कार्यकर्त्यांना अडचण नको म्हणून त्याच गावात या गट आणि गणांची तोडफोड करण्यात आली असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे. या संदर्भातील हरकती शासनाकडे नोंदवण्यात आहे. प्रसंगी कर्नाटकात जाण्याचा इशारा देखील म्हाकवे ग्रामस्थांनी दिला आहे.
कागल तालुक्यात जिल्हा परिषदेच्या वाढीव मतदारसंघाची रचना करताना म्हाकवे गावचा समावेश हा दळणवळणाच्या सुविधा नसणाऱ्या आणि डोंगर, नदी याचा विचार न करता केला आहे. याबाबत ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत म्हाकवे परिसरातील संलग्न गावे जोडून म्हाकवे हा जि. प. मतदारसंघ बनविण्यात यावा, अशी मागणी लावून धरली आहे.
याबाबत प्रशासनाला तसे म्हणणे ही ग्रामस्थांनी कळवले आहे. पण या मागणीचा गांभीर्याने विचार न केल्यास येणाऱ्या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकू, प्रशासनाच्या या मनमानी धोरणाविरोधात आम्ही कर्नाटकात सहभागी होऊ असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
याच विधानसभा मतदारसंघातील भौगोलिक संलग्नता असणाऱ्या सेनापती कापसी आणि जुना बोरवडे व नवीन बाणगे या मतदारसंघात जैन्याळ या एकाच गावाचा समावेश न करता 15 किलोमीटर दूर असणाऱ्या नानीबाई चिखली पंचायत समिती संघातील समावेश करण्यात आला आहे. तर हळदवडे हे गाव सेनापती कापशीला जोडले आहे. त्याबाबत देखील ग्रामस्थांनी हरकत प्रशासनाकडे नोंदवली आहे.
विधानसभा निवडणुकीत म्हाकवे गावातून समरजित घाटगे यांना 1 हजार 892 तर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना 1 हजार 839 इतकी मते मिळाली होती. तर जैन्याळ गावातून घाटगे यांना 659 तर मंत्री मुश्रीफांना 683 इतकी मते मिळाली आहे. या गावात घाटगे यांचा प्रभाव असल्याने जिल्हा परिषद निवडणुकीत फटका बसेल, अशी भीती अनेकांना आहे. याच भीतीपोटी नेत्यांनी गटच फोडल्याची चर्चा पंचक्रोशीत सध्या सुरू आहे.
प्र: म्हाकवे ग्रामस्थांचा नेमका विरोध कशावर आहे?
उ: जिल्हा परिषद गट रचनेत म्हाकवे गाव फोडल्यामुळे ग्रामस्थ संतप्त आहेत. त्यांनी रचना बदलण्याची मागणी केली आहे.
प्र: ग्रामस्थांनी कोणता इशारा दिला आहे?
उ: त्यांनी निवडणुकीत मतदान बहिष्कार टाकण्याचा आणि कर्नाटकात जाण्याचा इशारा दिला आहे.
प्र: या वादाचा राजकीय संबंध कोणाशी आहे?
उ: समरजीत घाटगे यांचा समर्थक गट फोडल्यामुळे महाविकास आघाडीला धक्का बसल्याची चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.